Citizens came out with handkerchiefs tied around their mouths.  esakal
जळगाव

Jalgaon Temperature Rise : जळगावचे तापमान 39 अंशावर; मेमध्ये अधिक तापमानाची धास्ती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात मंगळवार (ता. ४)पासून तापमानात वाढ (Temperature Rise) होऊ लागली आहे. बुधवारी (ता. ५) शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. (temperature was recorded at 39 degrees Celsius jalgaon news)

सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला तापमानाची वाटचाल ४० अंशाकडे झाली आहे. मे महिन्यात आणखी उन्हाचा तडाखा वाढेल, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.

यंदा ‘अल निनो’मुळे उन्हाळा अतिकडक राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिलपासून शाळांची वेळ सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत, तसेच दुपारी बारानंतर विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

शहरात उन्हापासून बचावासाठी नागरिक डोक्याला रूमाल बांधून किंवा टोपी घालून जाताना दिसत आहेत. महिला स्कार्फ गुंढाळून, सन कोट घालून उन्हापासून सरंक्षण करीत आहेत. उन्हापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक उसाचा रस, शितपेयांचा आस्वाद घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शितपेयांना मागणी वाढली आहे. आजचे कमाल तापमान ३८.६, किमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT