The corporator of BJP and Shiv Sena Shinde group while giving a statement that the statue of Sardar Vallabhbhai Patel should be unveiled on 31st October. eskal
जळगाव

Thackeray Vs BJP : सरदार पटेलांच्या पुतळा अनावरणावरून ठाकरे गट- भाजपमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा

Thackeray Vs BJP : महापालिकेच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून सत्ताधारी शिवसेना ठाकरे गट व विरोधी भारतीय जनता पक्षात वाद निर्माण झाला आहे.

शिवसेना ठाकरे गटातर्फे येत्या १० सप्टेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करणे निश्‍चित झाले आहे. त्यास भाजपने विरोध केला असून, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी अनावरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Thackeray group BJP dispute over unveiling of Sardar Patel statue jalgaon news)

जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असून महापौरपदी जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील आहेत. महापालिका आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे काम सुरू झाले आहे. हा पुतळा आमदार सुरेश भोळे यांनी स्वखर्चातून बनवून महापालिकेला दिला आहे.

पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटातर्फे या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री. ठाकरे येत्या १० सप्टेंबरला जळगावात येत आहेत. त्यांच्याहस्ते पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचेही अनावरण करण्यात येत आहे.

त्याच दिवशी त्यांच्या हस्ते महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली असून, शासकीय नियमाप्रमाणे हा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाजपसह शिवसेनेच्या शिंदे गटाने मात्र या अनावरण कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्यांनी पुतळ्याचे अनावरण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी म्हणजे ३१ ऑक्टोबरला करावे, अशी मागणी केली असून याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे.

सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी अनावरण करणे योग्य राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. भाजपचे महापालिकेतील गटनेते अश्‍वीन सोनवणे, शिंदे गटाचे गटनेते दिलीप पोकळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सिमा भोळे, नगरसेवक जितेंद्र मराठे, तसेच शिंदे गटाचे नवनाथ दारकुंडे आदींनी हे निवेदन दिले आहे.

"महापालिकेच्या आवारातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण १० सप्टेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संपूर्ण शासकीय प्रोटोकॉलनुसार जिल्ह्यातील खासदार, आमदार, तसेच महापालिकेतील सर्व गटांच्या नगरसेवकांना निमंत्रित करून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे." -जयश्री महाजन, महापौर, जळगाव

"जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी आपण २००४ पासून पाठपुरावा करीत आहोत. त्याला आता यश आले असून, महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याला विरोध न करता सर्वांनी एकत्रित येवून कार्यक्रम करावा." -विष्णू भंगाळे, नगरसेवक तथा जिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट

"सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबरला आहे. त्या दिवशी भव्य रॅली काढली जाते. समाजबांधव, तसेच नागरिक एकत्र येतात. त्यामुळे त्या दिवशी अनावरण करावे, अशी समाजबाधंवांची मागणी आहे. त्यामुळे त्या दिवशी अनावरण करण्याची मागणी केली आहे." -राजेंद्र घुगे पाटील, गटनेता, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT