crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सराफी दुकानात धाडसी चोरी; 10 हजार लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील गजबजलेल्या बाजार गल्लीतील सराफी दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी करून दुकानातील चांदीच्या वस्तू व दहा हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) पहाटे चारच्या सुमारास घडली.

दरम्यान, ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. (theft in Jewellery shop of 10 thousand jalgaon crime news)

गावातील ओम साई ज्वेलर्स हे विशाल शंकर सोनवणे (रा. पहूर) यांच्या मालकीचे आहे. ते नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी रात्री दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते.

दरम्यान, चोरट्यांनी शनिवारी (ता. २८) पहाटे चारच्या सुमारास ग्रँडरच्या साह्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील चांदीचे दागिने, वस्तू व रोख रुपये दहा हजार असा मुद्देमाल लंपास केला.

दुकानातील तिजोरी चोरट्यांकडून न फुटल्याने सोने सुरक्षित राहिले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्यात दोन चोरटे दिसत असून, त्यांनी चोरीसाठी प्लॅटिना गाडीची नंबर प्लेट झाकून व चेहरा बांधून दुकानात प्रवेश केल्याचे दिसून येते.

घटनास्थळी पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र वाघमारे व लोहारा आऊट पोस्ट अरविंद मोरे, शैलेश पाटील व इतर पोलिस स्टॉप यांनी पाहणी करून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT