farmer esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात घट; रावेर तालुक्यात कमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : तालुक्यात यावर्षी ८८.५३ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यात सर्वाधिक खिरोदा (प्र. यावल) व रावेर मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर पाच मंडळात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला आहे.

अवेळी पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन ३० ते ३५ टक्केच आले आहे . तालुक्यात गेल्या दशकात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. (This year production of kharif crops has decreased jalgaon agriculture news )

यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. तसेच मध्य प्रदेशातही जोरदार पाऊस पडल्यामुळे सुकी, अभोरा, गंगापुरी, मंगरूळ, मात्राण, चिंचाटी धरण ओव्हर फ्लो झाले होते. तसेच सप्टेबर महिन्यात जोमदार पाऊस पडल्यामुळे नदी नाले यावर्षी अडीच ते तीन महिन्यांपर्यंत वाहू लागले.

यामुळे यावर्षी तरी पाणीटंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र सुरवातीचा जून महिना व ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊन उडीद, मुग, मका, कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतकऱ्यांचा शेती खर्च निघणे ही मुश्कील आहे.

रावेर तालुक्यात यावर्षी रावेर महसूल मंडळात ६७८ मिमी., खिरोदा (प्र. यावल) ७२९ मिमी. या दोन मंडळात सर्वाधिक पाऊस पडला आहे तर सावदा ५७६ मिमी, ऐनपूर ५७३ मिमी, खिर्डी ५६८ मिमी, निंभोरा ५४० मिमी तर खानापूर मंडळात सर्वांत कमी ५१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी ५९१.५७ मिमी तर सरासरी ८८.५३ टक्के पाऊस पडला आहे.

दशकात पाच वर्षे कमी पाऊस

रावेर तालुक्याची सरासरी पर्जन्यमान ६६८.०२ मिमी आहे. दशकात पाच वर्ष पर्जन्यमान शंभर टक्केपेक्षा जास्त तर पाच वर्ष कमी पर्जन्यमान झाले आहे.

वर्ष पडलेला पाऊस मिमी ( कंसात टक्केवारी)

२०१४-१५...........४९६.५१ मिमी (७४.३१)

२०१५-१६...........७००.५४ मिमी (१०४.८४)

२०१६-१७...........७०८ मिमी (१०५.९६),

२०१७-१८...........६४९.८ मिमी (९७.२५)

२०१८-१९...........४७७.६ मिमी (७१.४८)

२०१९-२०...........१०२६.४३ मिमी (१५३.६१)

२०२०-२१...........६७३.७१ मिमी (१००.८२)

२०२१-२२...........७९६.७१ मिमी (११९.२३)

२०२२-२३...........६२१.८८ मिमी (९३.०६)

२०२३-२४............५९१.५७ मिमी (८८.५३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT