Thousands of farmers deprived of heavy rainfall fund jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : ‘ई-केवायसी’नंतरही शेतकऱ्यांना पैसा मिळेना; पारोळा तालुक्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित

संजय पाटील

Jalgaon News : गेल्या खरीप हंगामात (२०२२) सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. बऱ्याच गरजू शेतकऱ्यांनी हात उसनवारी व काहींनी बँकांचे कर्ज काढून आपल्या शेतीत पैसा ओतला.

मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा पाण्यात गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शेतकरी संघटनांनी शासनाकडे मागणी लावून धरली. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्यात सर्वात जास्त पारोळा तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मंजूर झाला. (Thousands of farmers deprived of heavy rainfall fund jalgaon news)

यात तब्बल ५८ हजार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करण्याचे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सेतू केंद्रात जाऊन अंगठा ठेवून ई केवायसी केली.

त्यानुसार चाळीस हजारांच्या वर शेतकऱ्यांना मदतीचा लाभ झाला. मात्र यातील उर्वरित शेतकऱ्यांनी मागील ऑगस्ट महिन्यात यादीत नाव आल्यानुसार सेतू केंद्रात ई केवायसी केली. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, शासनाकडून यादी येणे, त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे, तसेच शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करणे, एवढेच काम ‘महसूल’चे आहे. मात्र शेतकऱ्यांना मदतीच्या निधीबाबत महसूल विभागालाच दोष देत त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही मदत शासनाकडून मिळणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार प्रमाणीकरण केले असेल व सेतू केंद्रात ई केवायसी केली असेल, अशा शेतकऱ्यांना तो लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे. त्यांनी बँकेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे तसेच तेथील केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, एवढीच अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

"गेल्या दोन महिन्यांपासून मी आपले सरकार केंद्रात ई-केवायसी केली आहे. मात्र माझ्या खात्यावर अतिवृष्टीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या खात्यावर रक्कम जमा करावी, ही विनंती." - सुभाष पाटील, शेतकरी, पारोळा शिवार

"तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आले आहे, अशा खातेधारक शेतकऱ्यांनी बँकेत आधार लिंक करणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे दहा वर्ष जुने आधार कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांनी आधार केंद्रात जाऊन आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे." - डॉ. उल्हास देवरे, तहसीलदार, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT