Revenue officials and employees during the search operation of Kunbi records. esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरात हजारो कुणबी नोंदी सापडल्या; जीर्ण कागदपत्रांची पडताळणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाने आदेश देऊन तातडीने कुणबी नोंदी शोधायला लावून त्याचा संख्यात्मक अहवाल मागवला असल्याने जिकडे तिकडे सरकारी कार्यालयात कर्मचारी ‘कुणबी’ नोंदी शोधण्यात व्यस्त झाले आहेत.

शासनाने महसूल विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपालिका, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती व विविध शासकीय कार्यालयांना कालमर्यादा घालून दप्तरे शोधण्याचे निर्देश दिले आहेत. (Thousands of Kunbi records were found in Amalner jalgaon news)

महसूल कार्यालयातील रेकॉर्ड विभागाच्या काही कागदपत्रे वर्षानुवर्षे काढण्यात आलेले नाहीत. मात्र आता सर्वच दप्तर बाहेर काढण्यात आली आहे. कोतवालांची मदत घेतली जात आहे. यामुळे जुनी आणि जीर्ण झालेल्या कागदांचे तुकडे पडत आहेत. जेमतेम जोडलेली कागदाचे तुकडे विस्कळित झाल्याने काही नोंदी गहाळ होण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. परंतु यामुळे या विभागाची साफसफाई तरी होत आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात देखील सर्व खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे काढून बारीक बारीक नोंदी तपासल्या जात आहेत. नगरपालिकेत देखील सर्व रेकॉर्ड नोंदी तपासण्यात कर्मचारी मग्न झाले आहेत. जन्म-मृत्यूच्या नोंदी, वारस हक्काच्या नोंदी, अभिलेख सारेच कागदे चाळण्यात येत आहेत.

कोणीही नागरिक शासकीय कार्यालयात गेला की कर्मचारी कुठे असे विचारले की ते कुणबी नोंदी शोधत आहेत. आजपावेतो महसूल विभागात २४ हजार ५४ नोंदी तपासून त्यापैकी १ हजार ८६५ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.

शिक्षण विभागात २ लाख ५४ हजार ५८ पैकी ७ हजार १६४ नोंदी, दुय्यम निबंधक कार्यालयात २३ हजार ४३३ नोंदींपैकी फक्त ५, भूमिअभिलेख कार्यालयात ९ हजार ५०८ पैकी ४७ तर नगरपरिषदेत २ लाख १९ हजार ५०५ नोंदींपैकी १ हजार ४४ नोंदी कुणबी आढळून आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Latur Assembly Election 2024 : देशमुख विरुद्ध चाकूरकरांमध्ये सरळ लढत, लातूर शहर मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT