Officers and staff of the police team after arresting the accomplices of the absconding suspect Girish Tayde from M. Land Revenue. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गिरीश तायडे टोळीतील तिघांना अटक; गावठी पिस्तुलांसह, जिवंत काडतूस, हत्यारे जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील खडका गावातील महा.जमीन महसूलमधील फरार संशयित गिरीश तायडे याच्या साथीदारांना पकडण्यात बाजारपेठ पोलीसांना यश आले असून पोलिसांनी तिघा संशयित यांच्याकडून एका चारचाकीसह तीन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि हत्यारे जप्त केली.(Three arrested from Girish Taide gang with weapons jalgaon crime news)

महा.जमीन महसूलमधील फरार संशयित गिरीश तायडे हा बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडका चौफुली येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. श्री. आव्हाड यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित यास ताब्यात घेण्यासाठी खडका चौफुली येथे आपल्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सापळा रचला. सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान संशयित गिरीश देविदास तायडे हा चारचाकी (एमएच १९ डीव्ही २२३३) ने आपल्या तिघा साथीदारांसह तिथे आला.

यावेळी पोलिसांनी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला असता गिरीश याने चारचाकी थेट आपल्या साथीदारांसह खडका गावाच्या दिशेने पळून गेला. संशयित आणि त्याचे साथीदार पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. या दरम्यान संशयित गिरीश तायडे हा गाडी सोडून एका शेतात पळून गेला. तर त्याचे इतर साथीदार हे खडका गावाकडे निघून गेले.

यावेळी पोलिसांनी खडका गावात पोचत संशयित धिरज प्रकाश सोनवणे, मुकेश जयदेव लोढवाल, संजय शांताराम कोळी या तिघांना खडका गावातील एका ढाब्यावर चारचाकीसह अटक केली.

यावेळी पोलिसांनी या तिघांकडून चारचाकीसह तीन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दोन पिस्तूलचे बॅरल, एक लोखंडी कोयता, रॉड, मोबाईल असा ऐवज जप्त केला. यावेळी पोलिसांनी गाडीत गिरीश तायडे याचे आधारकार्ड देखील मिळून आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये, संदीप जाधव, गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT