Crime News esakal
जळगाव

Crime Update : तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून मंगळवारी (ता. २५) घडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मंगळवारी (ता. २५) रात्री संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय १९, रा. शिरसोली नाका) या तरुणाचा त्याच्या घराशेजारील मोनूसिंग, सोनूसिंग आणि मोहनसिंग यांच्याशी फटाके फोडण्यावरून वाद झाला होता. त्याच दिवशी बाचाबाची होऊन वाद मिटला होता.(Three arrested in connection murder of youth Jalgaon Crime News)

मात्र मंगळवारी रात्री संजयसिंग घराबाहेर बसलेला असताना मोहनसिंग व मोनूसिंग यांनी संजयसिंगवर चॉपरने वार करून त्याला जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी गेलेले त्याचे वडील प्रदीपसिंग, भाऊ करणसिंग, काका बलवंतसिंग, गल्लीतील बग्गासिंग टाक यांच्यावरही सोनूसिंग, जगदीशसिंग व सतकौरसिंग बावरी यांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

त्यानंतर त्यांच्यावर तुफान दगडफेकदेखील करण्यात आली होती. या स्थितीत गंभीर जखमी संजयसिंगला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांना तत्काळ अटक

खुनाची घटना घडल्यानंतर मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनूसिंग जगदीशसिंग बावरी व जगदीशसिंग हरिसिंग बावरी या तिघांना अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरित संशयित सोनूसिंग व त्याची आई सतकौर बावरी अद्याप फरारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT