forest ranger sakal
जळगाव

जळगाव : गस्तीवरील वनरक्षकावर दगडफेक

शिकारीसाठी बाँबगोळे घेऊन फिरणाऱ्याला हटकल्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा

कुऱ्हा काकोडा : जंगलात गस्त घालत (Patrolling the forest)व्याघ्र प्रगणना करत असताना रानटी डुकरांच्या शिकारीसाठी लहान बाँबगोळे घेऊन फिरणाऱ्या एकाला हटकल्याने त्याने वनरक्षकालाच (forest ranger) दगडाने मारहाण केल्याची घटना वढोदा जंगलात घडली. त्यात वनरक्षकाच्या हाताला जबर दुखापत होऊन टीच पडली आहे.

वढोदा वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र वढोदा पूर्वमध्ये वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे गस्त घालत होते. सोबतच अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना अंतर्गत मांसभक्षी प्राण्यांची गणना करत होते. तेव्हा वनखंड ५६१ मध्ये हलखेडा येथील फासेपारधी रहीम पवार त्याच्याजवळ रानडुकराची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे लहान बाँबगोळे घेऊन जात असताना त्यांना आढळून आला. या वेळी धुळगंडे यांनी त्याला हटकले असता पवारने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात धुळगंडे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली. पवार याने वनरक्षक धुळगंडे यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पवार याने दगडफेक सुरू केल्यामुळे धुळगंडे तेथून माघारी फिरले. याप्रकरणी वनरक्षक धुळगंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात संशयित रहीम पवार याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे व शासकीय कर्मचाऱ्याला दुखापत करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परवीन तडवी, कुऱ्हा चौकीचे सहाय्यक फौजदार माणिक निकम, पोलिस कर्मचारी हरीश गवळी, संजय लाटे, राहुल नावकर, सागर सावे आदी तपास करीत आहेत.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

वढोदा वनक्षेत्रातील वनखंड ५६१ मध्ये पट्टेदार वाघाचा अधिवास असून, २२ डिसेंबरला वनखंडाच्या शेजारीच असलेल्या वनखंड ५६२ मध्ये पट्टेदार वाघाने गोऱ्हा आणि गायीला ठार केले आहे. अशा संवेदनशील जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरात आणले जाणारे बाँबचे लहान गोळे घेऊन फिरणे हे वाघाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. वनक्षेत्राला कायम वनक्षेत्रपाल नाही. प्रभारी अधिकारी कारभार सांभाळत आहे. वाघाच्या सुरक्षेसोबतच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT