Timber seized by patrolling team of Forest Department. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वन विभागाच्या कारवाईत 90 हजारांचे लाकूड जप्त; अंधाराचा फायदा घेत चालक वाहन सोडून पसार

तालुक्यातील नायगाव - किनगाव रस्त्यावर पश्चिम वन विभागाच्या गस्ती पथकाने बोलेरो पीकअप व्हॅन वाहनासह पाच लाख रुपये किमतीचे खेर जातीचे मौल्यवान लाकूड जप्त केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील नायगाव - किनगाव रस्त्यावर पश्चिम वन विभागाच्या गस्ती पथकाने बोलेरो पीकअप व्हॅन वाहनासह पाच लाख रुपये किमतीचे खेर जातीचे मौल्यवान लाकूड जप्त केले आहे.

अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावर वाहन सोडून चालक पसार झाला आहे. (Timber seized by patrolling team of Forest Department jalgaon crime news)

वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंगळवारी (ता. २) यावलच्या वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिमसह शासकीय वाहनाने नायगाव - किनगाव मार्गावरील रस्त्यावर गस्त होते. या वेळी किनगावकडे जात असताना बोलेरो पीकअप हे संशयित वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून अंधारात पसार झाला.

या वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून पावतीने जमा करण्यात आले असून, जप्त माल महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी वाहन (क्रमांक एमएच ०४, जीआर ५३४३) या वाहनासह त्यात असलेले खैर जातीचे अंदाजे ५.००० घन मीटर लाकूड व वाहन तसेच मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ५ लाख रुपये एवढी आहे.

या कार्यवाहीत गस्ती पथकात वनपाल आर. बी. थोरात, वनपाल (वाघझिरा) विपुल पाटील, वनरक्षक (निंबादेवी) अक्षय रोकडे, वनरक्षक (मनुदेवी) चेतन शेलार, वाहनचालक योगिराज तेली तसेच पोलिस कर्मचारी सचिन तडवी यांनी सहभाग घेतला.

ही कार्यवाही धुळ्याचे वनसंरक्षक हृषिकेश रंजन, यावल उपविभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख, विभागीय वनधिकारी (दक्षता पथक धुळे) आर. आर. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक (यावल) प्रथमेश हडपे, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

वन विभागाकडून आवाहन

वन व वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे, असे आवाहन वन क्षेत्रपाल (गस्ती पथक) तसेच वनक्षेत्रपाल (यावल, पश्चिम) यांच्याकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT