Jalgaon: Francis Rupwate's Nativity scene made at home for Christmas. esakal
जळगाव

Christmas 2023 : ख्रिश्‍चन बांधवांचा पवित्र सण ‘ख्रिसमस’ आज

तयारी पूर्ण, चर्चवर रोषणाई; ‘येशू’चा जन्मोत्सव साजरा होणार

सकाळ वृत्तसेवा

Christmas 2023 : ख्रिश्‍चन बांधवांचा पवित्र सण ‘ख्रिसमस’ (नाताळ) सोमवारी (ता.२५) साजरा होत आहे. भारतातील ख्रिश्‍चन बांधवासह व परदेशातील बांधव या सणाला अनन्य साधारण महत्व देतात.

येशू ख्रिश्‍ताचा हा अवतरण दिवस नाताळ म्हणून साजरा केला जातो.(Today is holy festival of Christians jalgaon news)

नाताळ साजरा करण्यासाठी शहरातील संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च, अलायन्स चर्च, संत थॉमस चर्चमध्ये ख्रिसमच्या तयारी आज पूर्ण झाली आहे. शहरातील ख्रिस्ती बांधवांच्या घरी प्रभु यशूच्या जन्माच्या सुवर्ता फेरीने ख्रिसमसला गुरूवारपासूनच सुरवात झाली आहे. हा दिवस ख्रिस्ती बांधव ख्रिसमस (नाताळ) म्हणून साजरा करतात.

जळगाव शहरात तीन चर्च आहेत. त्यात रंगरंगोटी, आकर्षक सजावट केली आहे. ख्रिश्चन बांधवांनी त्यांच्या घरी, चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा उभारण्याचे लगबग सुरू झालेली आहे. ख्रिसमसनिमित्त चर्चमध्ये आजपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. सर्वच चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सांताक्लॉजच्या टोप्या, ड्रेस

ख्रिसमससाठी सांताक्लॉजच्या टोप्या, ड्रेस ,ख्रिसमस ट्री व इतर सजावटीच्या साहित्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. पन्नास रुपयांपासून ते शंभर, दोनशे रुपयां दरम्यान टोप्या मिळत आहे.

संत फ्रान्सिस डी सेल्स चर्च

गिरणा टाकी येथील संत फ्रान्सिस डी सेल्स चर्चमध्ये नाताळ सणाला सुरवात झाली आहे. चर्चचे सभासद ख्रिस्ती बांधवांच्या घरी जाऊन प्रभु यशूच्या जन्माची सुवार्ता फेरीच्या माध्यमातून पोहचविली आहे. बांधवांनी येशु जन्माचा देखावा उभारण्याची, स्टार कंदील, ख्रिसमस ट्री स्पर्धा देखील आयोजित केली आहे.

रविवारी (ता.२४) चर्चमध्ये मध्यरात्री येशूचा जन्मोत्सव साजरा करणयात आला. प्रार्थना करण्यात आली. उद्या (सोमवार, ता.२५) सकाळी नऊ वाजता चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचा प्रार्थना, भक्तीचा कार्यक्रम होतील. सर्व समाजबांधवासाठी प्रभु यशूच्या दर्शनासाठी सोमवारी चर्च दिवसभर खुले राहणार आहे.

अलायन्स चर्च

पांडे डेअरी चौक येथील अलायन्स चर्च येथे ख्रिसमस निमित्त उद्या (ता.२५) चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रभु यशू यांचे विचारांची माहिती देण्यात येईल.आज सायंकाळी पाच ते सात पर्यंत नाताळ पूर्व संध्या उपासना करण्यात आली. सोमवारी सकाळी दहाला नाताळ उपासना कार्यक्रम होणार आहे. १ जानेवारीपर्यंत चर्चमध्ये विविध कार्यक्रम होतील. नाताळ सणाबाबत ख्रिश्‍चन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT