Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : Toilet घोटाळा प्रकरणातील संशयित मंजुश्री पवार अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यभर गाजलेल्या येथील ‘टॉयलेट’ घोटाळ्यातील संशयित मंजुश्री पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल १३ महिन्यांनंतर त्या बुधवारी (ता. २१) येथील पोलिस ठाण्यात हजर झाल्या. त्यांना येथील न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

येथील पंचायत समितीत शौचालय अनुदान घोटाळ्याबाबत १९ एप्रिल २०२२ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Toilet scam case Suspect Manjushree Pawar arrested Jalgaon Crime News)

ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त शासकीय अनुदानाचा गैरव्यवहार करून समाधान निंभोरे (गट समन्वयक) व मंजुश्री पवार (समूह समन्वयक) या दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मिळून हा गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

आतापर्यंत या घोटाळ्यातील २७ संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, मंजुश्री पवार या अटक झालेल्या २८ व्या संशयित आरोपी आहेत.

यातील बहुतेक सर्व संशयितांकडून पोलिसांनी घोटाळ्यातील १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली केली आहे. श्रीमती पवार यांनी ४ लाख २० हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या बाबत आधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आखेगावकर करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

IND vs NZ, Mumbai Test: भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, तर न्यूझीलंड संघातून सँटेनर बाहेर; पाहा दोन्ही टीमच्या प्लेइंग-११

Google Fined: रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT