esakal
जळगाव

Jalgaon Crime : गर्लफ्रेंड झालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार; खोट्या नावाने प्रेमाचे नाटक, संबध अन्‌ हाती बेड्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : महाविद्यालयात ज्युनियर असलेल्या विद्यार्थिनीशी खोटे नाव सांगून मैत्री केली. प्रेमाचे नाटक करुन सेल्फी काढल्या. नंतर ईच्छेविरुद्ध संबध ठेवून ब्लॅकमेलींग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर अत्याचार केल्याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून इमरान शब्बीर मनियार व त्याला सहकार्य करणारा मित्र इक्बाल खान अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Torture of woman for year by threatening to make photo viral jalgaon crime news)

येथील नामांकित महाविद्यालयात नव्याने आलेल्या पिडीत विद्यार्थिनीची एप्रिल- २०२२मध्ये कॅन्टीनमध्ये इमरानशी ओळख झाली. त्यावेळी त्याने स्वतःचे नाव जॅक ऊर्फ सागर सोनवणे (रा. साक्री, ता. धुळे) असे सांगितले होते.

दरम्यानच्या काळात दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. थोड्याच दिवसात दोघे इंस्टाग्रामवर भेटले असता, त्याचे नाव इमू मन्यार असल्याचे पिडीतेने पाहिले. याबाबत विचारणा केली असता, मुस्लीम मुलांशी मुली बोलत नाहीत. म्हणून नाव खोटे सांगितले असल्याचे त्याने मान्य केले.

सेल्फीतून सुरवात

महाविद्यालयीन प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने विद्यार्थिनीसोबत सेल्फी काढले. जून-जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इम्रानने तिला तो राहत असलेल्या रामानंदनगर स्टॉपजवळील खोलीवर बोलाविले.

त्याठिकाणी त्याचा मित्र इक्बाल याच्यासोबत ओळख करून देत तो निघून गेला. काही वेळाने अंगलट करण्याचा प्रयत्न करीत सेल्फी काढले. ते डिलीट करण्यास सांगितले असता, त्याने काही होत नाही म्हणून नकार दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फोटो व्हायरल करण्याची धमकी...

पुन्हा काही दिवसांनी त्याने फोन करून भेटण्यास बोलाविले. मात्र तिने नकार दिल्याने त्याने फोटो आई-वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी ती भेटायला गेली असता, त्याने जबरदस्ती अत्याचार केला. ऑगस्ट-सप्टेंबर २०२२ मध्येही अजिंठा चौफुलीजवळ एका हॉटेलमध्ये बोलाविले.

त्यावेळीही त्याने, गेल्यावेळी आपल्या संबंधांचे फोटो इकबाल याने काढल्याचे सांगून फोटो दाखवत पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर पिडीत विद्यार्थिनीने हळूहळू त्याच्याशी संबंध तोडत त्याचा क्रमांक ब्लॉक केला.

तरीदेखील त्याने अन्य क्रमांकावरून त्रास देणे सुरूच ठेवले. रविवार (ता. १३)पासून त्याने पुन्हा फोटो, मेसेज करून धमकावण्यास सुरवात केली. त्रास असह्य झाल्याने पिडितेने हा सर्व प्रकार मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला सांगितल्यावर रामानंदनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

जाब-जाबाब

रामानंदनगर पोलिसात रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिसात इमरान शब्बीर मन्यार, इक्बाल खान (रा. परभणी दोघे ह. मु. आदर्शनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान याच्याकडून ४ मोबाईल, एक लॅपटॉप हस्तगत केला असल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT