Jalgaon News : येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी, तहसीलदारांसह सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयांसह सर्व प्रांत व तहसील कार्यालयांमध्ये पेपरलेस कामकाजासाठी ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. तिचा वापर, उपयोग याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. (training was given to all officers and employees including District Officer Tehsildar on e office system jalgaon news)
याप्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद हिले व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रोजेक्टरद्वारे ई-ऑफिस प्रणालीचा वापर कसा करावा, शासकीय संकेतस्थळावरील नोंदी घेणे, नोंद टाकणे, ऑनलाइन पत्रव्यवहार, प्रशासकीय कामकाज पेपरलेस कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
अर्ज होणार ऑनलाइन हस्तांतर
ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांमधील दस्तऐवज सुरक्षित, पारदर्शक काम ई-ऑफिस प्रणालीचे कामकाज प्रारंभी काही दिवस ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात होईल. यानंतर नियमित ऑनलाइन कामकाज करावे लागणार आहे. यामुळे दस्ताऐवज सुरक्षित आणि माहिती तत्परतेने मिळण्यास मदत होईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ऑनलाइन हस्तांतरणामुळे वेळेची बचत
कार्यालयात प्राप्त होणारे विविध प्रकारचे अर्ज हे ऑनलाइन हस्तांतर होतील. म्हणजे त्यावर जलद कार्यवाही शक्य होईल. नागरिकांच्या तक्रारी, समस्या जलद गतीने सुटतील. ई ऑफिस प्रणालीचे जिल्हा प्रकल्प समन्वयक तथा मास्टर ट्रेनर जितेंद्र कोळी, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक राहुल जाधव यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सात उपविभागीय कार्यालय व सर्व १५ तहसील कार्यालयात हे प्रशिक्षण देणे सुरू आहे.
याप्रसंगी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर तहसीलदार जगदीश भारकर, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, नायब तहसीलदार विकास लाडवांजरी, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार भानुदास शिंदे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संदेशकुमार निकुंभ व सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.