tribal woman  esakal
जळगाव

आदिवासी महिलेची 2 लाखांत विक्री

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : एका आदिवासी महिलेला जबरदस्तीने दोन लाख रुपयांत विकून तिच्याशी लग्न लावून अत्याचार केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील आठ जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाल (ता. रावेर) येथील एका आदिवासी महिलेस दोन अनोळखी महिला, तसेच राकेश वर्मा, शामू वर्मा, भगीरथ वर्मा, कमल वर्मा, दिनेश वर्मा व तेजू (पूर्ण नाव माहीत नाही. रा. घोयला. जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांनी नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध असताना, तिची दोन लाखांत विक्री करून लग्न करण्याच्या उद्देशाने तिला पळवून नेऊन. रावेर बसस्थानक, घोयला येथील घरी व इतर ठिकाणी राकेश वर्मा याने महिलेशी लग्न करून अत्याचार केला व ठार मारण्याची धमकी दिली. या महिलेस इतरांनी डांबून मारहाण केली. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT