Death news esakal
जळगाव

Jalgaon News : जेवणाला जातोय सांगून गेला अन् घरी परतलाच नाही...

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आपल्या मित्रांच्या आग्रहाखातर जेवणाला गेला आणि हॉटेलमधून बाहेर पडताच तरुणाला ट्रकने चिरडले. ही घटना शनिवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाईसमोर घडली. (truck crushes bike rider in front of Hotel Girnar near Bambhori Bridge jalgaon accident news)

अक्षय भेंडे (वय ३२ रा. वर्धा, ह.मु. रामानंद, जळगाव), असे मृत तरुणाचे नाव आहे. एका फायनान्स कंपनीतील कर्मचारी मार्च एंडचे काम संपवून जेवणाला गेले अन्‌ मित्राला गमावून बसल्याचा आक्रोश सहकाऱ्यांंनी केला.

मार्च एंडचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीतील १० ते १५ कर्मचारी बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाईमध्ये जेवणासाठी गेले होते. अक्षय भेंडे याचा जेवण्यासाठी येण्यास नकार होता. इच्छा नसल्याने व दुसरे कामाचे नियोजन असल्याने तो येणार नव्हता. मात्र, मित्रांच्या आग्रहाखातर तो तयार झाला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

परिणामी, सर्वांत उशिरा तो पोचला. जेवण आटोपल्यानंतर हॉटेलमधून सर्व सहकारी आपआपल्या वाहनांनी बाहेर पडत असताना, अक्षय दुचाकी (एमएच ४९, एटी ४४०७)वरून राष्ट्रीय महामार्गावर येत असताना, मुंबईकडून भरधाव येत असलेल्या १२ चाकी ट्रॉला (एमएच ३२, आर ४०७२)च्या पुढील बंफरचा धक्का लागल्याने अक्षय थेट चाकाखाली आला. परिणामी, अक्षय जागीच ठार झाला.

अपघात एवढा भयंकर होता, की मृतदेहाचा छातीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचले. तोपर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आणि वाहतूक सुरळीत केली व ट्रकचालकाला ताब्यात घेतले. मृत अक्षयच्या मित्रांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मृत अक्षयच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षांची मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT