accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कंपनीच्या गेटवरच वॉचमनला ट्रकची धडक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : औद्योगीक वसाहत परिसरातील जीबी. इंडस्ट्रीज या कारखान्यात माल खाली करण्यासाठी आलेल्या ट्रक चालकाने कंपनीच्या वॉचमनलाच चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता.२३) घडली.

गंभीर जखमी वॉचमनला खासगी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. (truck hit watchman at gate of company jalgaon accident news)

ट्रकचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. औद्योगीक वसाहत परिसरातील एम सेक्टर येथे गीतेश मुंदडा यांच्या मालकीची जी.बी. इंडस्ट्रीजम्हणून कंपनी आहे. कंपनीत वॉचमन सुकदेव आनंदा सापकर (वय ६०, रा. तुळजाई नगर कुसुंबा) हे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत.

आज नेहमीप्रमाणे सुकदेव सापकर कंपनीच्या गेटवर कर्तव्यावर हजर असतांना दुपारी सव्वातीनच्या सुमारास (एम.एच.२८ बी.बी.५३९९) हा ट्रक माल घेऊन आला. ट्रकवरील चालक कंपनीत ट्रक घालण्यासाठी मागे घेत असतांना गेटवर सुकदेव सापकर यांच्या अंगावर ट्रक आणून चिरडण्याचा प्रयत्न केला.

वेळीच इतरांनी आरडाओरड केल्याने चालकाने ट्रक थांबवला. मात्र, तोपर्यंत सुकदेव सापकर जखमी झाले असल्याने चालकाने ट्रक पुढे घेवुन पळ काढला. कंपनीतील कामगारांसह मालक गीतेश मुंदडा यांनी जखमी सुकदेव सापकर यांना घेत खासगी रुग्णालय गाठले.

ओंकारनगरातील ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून जखमीचे जावई ज्ञानेश्वर हरणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT