भुसावळ : येथील महसूल विभागाच्या पथकाने ७ डिसेंबरला अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर जप्त करून तहसील कार्यालयात उभे करण्यात आले होते. मात्र, हे डंपर आदेश नसतानाही शुक्रवारी (ता. ९) दंड न भरता परस्पर पळवून नेल्याने चालक व मालकास समज देण्यात आली.
भुसावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अवैध गौणखनिज प्रतिबंधात्मक तपासणी दरम्यान उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी बुधवारी (ता.७) रात्री दहाला भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ महामार्गावर वाळू वाहतूक करणारा ट्रक थांबविला. (Truck seized from Bhusawal Tehsil ran away Jalgaon News)
तपासणी दरम्यान परवाना मागणी केली असता वाहनचालकाकडे वैध परवाना नव्हता. हे वाहन (एमएच १९, झेड ४८४७) अवैध गौणखनिज प्रतिबंधात्मक तपासणी दरम्यान आढळून आल्याने उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्या आदेशावरून जप्त करून तहसील आवारात लावण्यात आले होते.
जप्त केलेल्या वाहनाचे कागदपत्रे तपासणी केली असता वाहनचालक वाहनाचा क्रमांक बदलवून (एमएच १९, झेड १६१३) वापर करीत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनचालक व मालक राहुल सुकलाल भोई (रा. भोईनगर, भुसावळ) यास परस्पर वाहन नेल्याने समज देण्यात आली आहे.
महसूल विभाग गप्पच..
रेती, खडी, पोकलँड मशीन पळवून नेल्याची घटना नवीन नसून या आधीही अशा कित्येक घटना घडल्यानंतरही महसूल विभाग हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहे. या घटनांना अंजाम देणारा मुख्य सूत्रधार एक दलाल असून, अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा खेळ सुरू आहे? तहसील आवारामधून एवढी वाहने पळवून शासनाचा महसूल बुडवून सुद्धा कुंभकर्णी झोपेत असलेले महसूल विभाग कधी जागे होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.