Jalgaon Crime : येथील बँकेसमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख पन्नास हजार रुपये अज्ञात व्यक्तीने लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. ९) दुपारी तीनच्या सुमारास एचडीएफसी बँकेसमोर घडली. बँकेच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे.
येथील सम्यक इंग्लिश मीडियम स्कूलचे बांधकाम सुरू असल्यामुळे ठेकेदारास पैसे द्यावयाचे असल्यामुळे शाळेच्या प्राचार्या नीता पाटील यांनी शिक्षक उज्ज्वलसिंग विजयसिंग पाटील यांना धनादेश दिलेत. (Two and half lakh stolen from trunk of 2 wheeler Jalgaon Crime)
उज्ज्वलसिंग पाटील यांनी दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँकेतून तीन लाख रुपये काढले आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यांनंतर उज्ज्वलसिंग पाटील हे दुचाकीने (क्रमांक एमएच १९, बीव्ही ५२८८) राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले.
बँकेसमोर दुपारी तीनच्या सुमारास दुचाकी उभी करून ते बँकेत गेले असता चोरट्याने गाडीच्या डिक्कीतून सुमारे अडीच लाखांची रक्कम काढून पसार झाला. उज्ज्वलसिंग पाटील हे बँकेतून बाहेर आले असता त्यांना गाडीची डिक्की उघडी दिसली.
त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता चोरट्याने डिक्कीतील तीन लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये लंपास केल्याचे लक्षात आले आणि पन्नास हजार रुपये डिक्कीतच आढळून आल्याने ते त्वरित बँकेत गेले आणि बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता एक संशयित
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्याठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले. चोरटा स्टेट बँकेपासूनच उज्ज्वलसिंग पाटील यांचा पाठलाग करीत असण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेतील सीसीटीव्हीत एक अज्ञात व्यक्ती दिसत असून, तीच अज्ञात व्यक्ती एचडीएफसी बँकेच्या सीसीटीव्हीत दिसत आहे. अडीच लाख रुपयांची चोरी झाली असल्याची माहिती उज्ज्वलसिंग पाटील यांनी प्राचार्या नीता देवरे, डॉ. राहुल
पाटील, शैला पाटील, विलास पाटील यांना दिली. याबाबत उज्ज्वलसिंग पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.