Jalgaon News : कुपोषण हा आपल्या देशाला लागलेला एक अभिशाप आहे, त्यातून मुक्त होऊन सशक्त भारताच्या निर्मितीच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून ‘सुपोषित भारत’ या योजनेचा प्रारंभ राष्ट्रीय सेवा भारतीने केला आहे.
याबाबत दोनदिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून विचारमंथनास प्रारंभ झाला.(two days training class On Making India Malnutrition Free jalgaon news)
सेवा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल कुमार, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, राष्ट्रीय सेवा भारतीचे उपाध्यक्ष श्रवणकुमार, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद फाटक, केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर आदी उपस्थित होते.
श्रवणकुमार यांनी प्रास्ताविकात सेवा भारतीच्या जागरण, सहयोग, प्रशिक्षण व अध्ययन या चतु:सूत्रीबाबत माहिती दिली.
कुपोषण मुक्तीसाठी तयार : डॉ. ठाकूर
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील कुपोषण मुक्तीसाठी शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कुपोषित बालकांना योग्य त्या आरोग्यसेवा देत आहोत.
माजी वैद्यकीय व आरोग्य शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावला मेडिकल हब बनविण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच शहरात विविध शासकीय रुग्णालये तयार होत असल्याचे शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा भारतीचे पदाधिकारी डॉ. अनुराधा, डॉ. प्रतिभा फाटक, विजय पुराणिक, डॉ. सुदामे, सुरेंद्र तालखेडकर, रुची शर्मा, डॉ. मीनाक्षी आदी उपस्थित होते.
सुपोषित आहाराबाबत जागृतीची गरज : डॉ. फाटक
डॉ. हेडगेवार रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद फाटक यांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून कुपोषण कसे होत आहे, हे सांगत त्यावर सपोषण कसे करावे, याबाबत सादरीकरण केले. सकस आहार न मिळणे हे कुपोषणाचे एक कारण असले तरी कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचाही शोध घेतला गेला आहे.
त्यात कमी वयात मुलींचे विवाह करणे, कमी वयातील मुलींच्या शरीराची पूर्ण वाढ न झाल्याने तिचेच आरोग्य कुपोषणाकडे वळत असताना आलेले मातृत्व, रक्ताची कमतरता असणे यांसारखी अनेक कारणे आहेत. सकस आहाराबाबत जनजागती करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.