Inspector Jaipal Here along with the team that arrested the duo with a sharp knife and a chopper. Swapneel aka Golu Thakur and Nishant Chaudhary esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दोघा हद्दपार गुन्हेगारांना धारदार कोयत्यांसह अटक; एमआयडीसी पोलिसांनी पकडले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव शहरासह जिल्ह्याची गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्‍हा पेालिस अधीक्षकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी कारवाईचा सपाटाच लावला आहे.

त्यातच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार शहरातच राहून धारदार शस्त्रांसह दहशत माजवताना मिळून आले असून दोघांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Two deported criminals arrested with sharp knives jalgaon crime news)

निशांत प्रताप चौधरी आणि स्वप्नील ऊर्फ गोलू धर्मराज ठाकूर (दोघे राहणार डीएनसी कॉलेज, शंकरराव नगर, जळगाव) अशी दोघांची नावे आहेत. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यांअतर्गत वांरवार गुन्हे करणारे, गंभीर गुन्ह्यात सहभागी अट्टल गुन्हेगार आणि जनसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्यातून हद्दपारीसह मकोका, एमपीडीएच्या प्रभावी कारवाईचे हत्यार उपसले आहे.

त्यात ४७ गुन्हेगारांना ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून दोन टोळ्यांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करुन कारागृहात डांबण्यात आले आहे. तर, जनसामान्यांच्या जीवितास आणि मालमत्तेला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने जवळपास अडीच हजारांवर सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना प्रदान विशेष अधिकारांतर्गत तुकारामवाडीतील रहिवासी निशांत प्रताप चौधरी (वय-२०), स्वप्नील ऊर्फ गोलू धर्मराज ठाकूर (वय-२०) या दोघांना १९ ऑक्टोबर २०२३पासून जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

एका मागून एक अटकेत

असे असताना दोघेही हद्दपारीचे आदेश झुगारुन सर्रासपणे शहरात वावरत असल्याची माहिती गुप्त माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यावरुन त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, मुकेश पाटील, नितीन ठाकूर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील अशांनी निशांत चौधरीला तुकारामवाडीतून ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत मटण कापायला वापरतात तसा धारदार कोयता मिळून आला. त्याची चौकशी करुन ताब्यात घेताच पांडे डेअरी चौकात त्याचाच मित्र स्वप्नील ऊर्फ गोलू ठाकुर याला थांबवून विचारणा केल्यावर त्याची धांदल उडाल्यावर त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या जवळ हातभर लांब धारदार आणि तीक्ष्ण चॉपर मिळून आला असून दोघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT