uddhav thackeray  esakal
जळगाव

Jalgaon News : पाचोरा येथे आज उद्धव ठाकरेंची सभा; जय्यत तयारी!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेते रविवारी (ता. २३) पाचोरा येथे येत असून, या निमित्ताने विराट जाहीर सभा होणार आहे. (Uddhav Thackeray are coming to Pachora 23 april today jalgaon news)

दुपारी दोनच्या सुमारास श्री. ठाकरे यांचे पाचोरा येथे आगमन झाल्यानंतर जळगाव चौफुलीवर स्वागत करून युवकांच्या बाईक रॅलीने त्यांना भडगाव रोड भागातील महाराणा प्रताप चौकापर्यंत आणण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी व गगनभेदी घोषणा या वेळी करण्यात येणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात प्रकृती ठीक नसतानादेखील कोरोना महामारी नियंत्रणासाठी केलेले प्रशंसनीय कार्य व हजारो नागरिकांचे वाचवलेले जीव या कार्यामुळे महाराणा प्रताप चौकात पाचोरा व भडगाव शिवसेनेतर्फे त्यांचा नागरी सत्कार होणार आहे.

त्यानंतर निर्मल सीड्सच्या विश्रामगृहात ते थांबणार असून, दुपारच्या भोजनानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास निर्मल सीड्सच्या मायकोरायझा प्रयोगशाळेच्या प्रांगणात परिसरातील विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवरांशी ते विविध विषयांवर चर्चा करून अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दिवंगत माजी आमदार आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या सर्वसमावेशक अशा वाटचाल व प्रगतीवर आधारित चित्रफीत या वेळी दाखविण्यात येईल. त्यानंतर प्रयोगशाळेचे उद्‌घाटन, माजी आमदार स्व. आर. ओ. तात्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व त्यानंतर निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणातील पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पुतळा अनावरणानंतर जयकिरण धामतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार असून, या ठिकाणीदेखील ते मान्यवरांशी हितगूज करणार आहेत.

त्यानंतर निर्मल सीड्सच्या विश्रामगृहात विश्रांतीनंतर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सावा मैदानावरील जाहीर सभेच्या ठिकाणी ते उपस्थित होतील. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनंत गीते, सुषमा अंधारे, खासदार अरविंद सावंत, अंबादास दानवे, संजय सावंत आदी नेते मनोगत व्यक्त करून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे हे शिवसेना सोडून गेलेल्या पाचोरा व जिल्ह्यातील आमदारांवर काय बोलतात? कोणते टीकास्त्र सोडतात? याची उत्सुकता लागली आहे. जाहीर सभेनंतर ते जळगावकडे रवाना होणार आहेत.

शहराला भगवे रूप

या जाहीर सभेनिमित्त शहराला भगवे रूप प्राप्त झाले आहे. शहरातील व शहरालगतच्या महामर्गावरील सर्व चौक, रस्ते भगवे झेंडे व पतकांनी सजविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी लावलेल्या स्वागत कमानी, कट आउट, मोठमोठे डिजिटल बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या विराट सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, सुमारे दीड लाख शिवसैनिक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

त्यादृष्टीने त्यांना आरामदायी बसण्याची व्यवस्था व भव्य दिव्य देखणे असे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा दौरा व त्या निमित्ताने होणारी टीका टिप्पणी विचारात घेऊन केलेल्या वक्तव्यामुळे या सभेने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT