Uddhav Thackeray  esakal
जळगाव

Uddhav Thackeray News: देशातील मोदी सरकार 2024 ला हटविणारच : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

Uddhav Thackeray News : शेतकऱ्यांना पीकविमा दिला जात नाही, उज्ज्वला गॅस अंतर्गत महिलांना गॅस दिला जात नाही, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नाही, सर्व काही नाही, नाही म्हणणाऱ्या या केंद्रातील मोदी सरकारला येत्या २०२४ च्या निवडणुकीत जनता सत्तेवर ठेवणार नाही.

त्यांना हटविणार म्हणजे हटविणारच, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथील जाहीर सभेत रविवारी (ता. १०) दिला. (Uddhav Thackeray statement Modi government will be removed from the country in 2024 jalgaon political)

जळगाव येथील मानराज पार्कजवळील मैदानात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आदी उपस्थित होते. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रास्ताविक केले. सभेला मोठी गर्दी होती.

श्री. ठाकरे म्हणाले, की सर्व विरोधी पक्षाची एकजूट झाल्यानंतर आता ‘इंडिया’ आघाडीला केंद्रातील सरकार एवढे घाबरले आहे, की ते हलायला लागले आहे. त्यांना ‘इंडिया’नावाचीही खाज सुटायला लागली आहे.

ते आता बदलून ‘भारत’ म्हणायला लागले आहेत. परंतु आम्ही इंडिया, भारत आणि हिंदुस्थानही म्हणणार आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे ‘शिवसेनेची काँग्रेस होऊन देणार नाही’ असे फलक विरोधक लावत आहे.

होय, मी शिवसेनेची काँगेस होऊच देणार नाही. २५ वर्षे सोबत राहून शिवसेनेची भाजपही झालेली नाही. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही. आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही, त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांना आम्ही मोडून तोडून टाकणार आहोत.

जालन्याचे जालियानवाला बाग केले

जालना येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला. ते अतिरेकी असल्याप्रमाणे त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, जालन्याचे जालियानवाला बाग केले. महाराष्ट्रात ही राक्षसी औलाद कशी आली? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फडणवीसांनी भाजप संपविली

भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, की भाजपने विरोधी पक्ष फोडो नीती वापरली आहे. त्यांनी पक्ष फोडून लोक आपल्याकडे घेतले आहेत, त्या भाजपमध्ये मूळ राहिले कोण? अगदी एकनाथ खडसे यांचाही त्यांनी छळ करून त्यांना पक्षाबाहेर काढले.

आज सगळे उपरे राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप संपविली आहे. आता ते महाराष्ट्रात या आयाराम लोकांचे संपर्क मंदिर बांधत आहेत.

विशेष अधिवेशात आरक्षण द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अधिवेशन बोलाविले आहे. त्या अधिवेशनात त्यांनी मराठा, धनगर, ओबीसी समाजाला आरक्षण देऊन त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करावी, शिवसेनेचा त्यांना पहिला पाठिंबा देईल, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी केले.

सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त केला

राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आहे, अशी टीका करीत श्री. ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री दिल्लीत कायम पंतप्रधानांकडे जात असतात.

आजही ते दिल्लीतच गेले आहेत. मात्र त्यांना जालना येथे मनोज जरांगेंना भेट देण्यास वेळ नाही. आज शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न ‍सोडविले जात नाहीत. भारनियमन केले जात आहे. जनतेला वीज नाही, पण वीजबिल दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT