MLA Mangesh Chavan while removing curtains in 'dark room' in us cafe 
जळगाव

Jalgaon Crime News: चाळीसगावला अनधिकृत कॅफे उद्ध्वस्त; 6 मुले, मुली आली मिळून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News: येथील हिरापूर रोडवरील चव्हाण महाविद्यालयासमोरील पालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृतरित्या चालवणाऱ्या जाणाऱ्या कॅफेसंदर्भात तक्रार प्राप्त होताच, आमदार मंगेश चव्हाण यांनी धडक देत पोलिसांच्या उपस्थितीत स्वतः या कॅफेमधील साहित्याची तोडफोड करुन हा कॅफे उद्ध्वस्त केला.

या ठिकाणी सहा मुले व मुली अश्‍लिल कृत्य करताना मिळून आल्याने आमदार चव्हाण चांगलेच संतापले होते. दरम्यान, जी कारवाई पोलिसांनी करायला हवी होती, ती कारवाई आमदार चव्हाण यांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. (Unauthorized cafe destroyed in Chalisgaon Jalgaon Crime News)

शहरातील अशाच काही कॅफेमध्ये मुलामुलींना ‘डार्क रूम’सारखी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हिरापूर रोडवरील यू. एस. कॅफेमध्ये देखील अशीच व्यवस्था होती. अनेक तरुण, तरुणी या ठिकाणी जात असल्याचे कॉम्प्लेक्समधील दुकानदारही त्रस्त झाले होते. या ठिकाणी अश्‍लिल कृत्य करण्याचे प्रकार वाढले होते.

यापूर्वी पोलिसांनी दोन वेळा कारवाई केल्याचे सांगितले असले तरी संबंधित कॅफे चालकाने जे करायचे ते सुरुच ठेवले होते. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने काहींनी थेट आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडेच तक्रार केली. आमदार चव्हाण यांनी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वतः यू. एस. सायबरवर जाऊन धडक दिली.

नावाला होता कॅफे

आमदार मंगेश चव्हाण यांनी यू. एस. कॅफेमध्ये जाऊन पाहिले असता, त्यात ‘डार्क रूम’ आढळून आला. कॅफेच्या बाहेर कॅफे आणि रेस्टॉरंटचा फलक लावलेला असताना आतमध्ये मात्र अशा कुठल्याही प्रकारची चहा, नाश्ता अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. आतील ‘डार्क रुम’चा वापर तरुण, तरुणींना दिला जात असल्याचे दिसून आले.

यावेळी सहा मुले व सहा मुली मिळून आल्या. हा कॅफे केवळ नावाला कॅफे होता हे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार चव्हाणांनी आतील साहित्य स्वतः तोडण्यास सुरवात केली. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे काही सहकारी उपस्थित होते.

पालिकेकडून कारवाई

या कारवाईची माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळताच पालिकेचे दिनेश जाधव, प्रेमसिंग राजपूत, दिलीप चौधरी, किरण मोरे, नितीन सूर्यवंशी आदींनी येऊन हा अनधिकृत कॅफे उद्ध्वस्त केला. हा कॅफे विना परवानगीने सुरु असल्याचे दिनेश जाधव यांनी सांगितले. पालिकेचे कार्यालय येथून हाकेच्या अंतरावर असताना पालिकेने आतापर्यंत अशी कारवाई का केली नाही? याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

"माझी नागरिकांना विनंती आहे, की शहर किंवा परिसरात असे चुकीचे प्रकार कुठे होत असतील तर ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या मी खंबीरपणे पार पाडण्यास बांधील आहे. पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी काय करतात, याची व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे. मुली पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रत्येकच मुलगा किंवा मुलगी अशी असते असे नाही, पण एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे ‘कौन्सलिंग’ केले पाहिजे. आजचे प्रकरण हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे. असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत. गरज पडली तर अशा अनधिकृत बांधकामांवर ‘जेसीबी’ चालवला जाईल" - मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT