Jalgoan Crime News: आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्यासाठी कॅफेच्या नावाखाली जागा उपलब्ध करुन देणाऱ्या दोघा कॅफे चालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, हे दोघे या कॅफेमध्ये येणाऱ्या तरुण, तरुणींना असभ्य कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत त्यांच्याकडू त्यापोटी पैसे आकारत असल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. (Unauthorized cafe operator arrested jalgaon crime news)
आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या या कारवाई संदर्भात माहिती देताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले, की शहरातील हिरापूर रोडवरील चव्हाण महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील नगरपालिका कॉम्प्लेक्समध्ये उमाकांत दिलीप अहिरराव हा त्याच्या यु. एस. कॅफेमध्ये सभोवतालच्या परिसरातील शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसह तरुण- तरुणींना कॉफी, चहा देण्याच्या निमित्ताने कॅफेमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत होता.
त्या ठिकाणी त्यांना आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्यासाठी परवानगी देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. त्याचा आजूबाजूच्या दुकानदारांनाही त्रास होत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई संदीप पाटील यांच्यासह त्यांचे कर्मचारी योगेश बेलदार, पंढरीनाथ पवार, दीपक पाटील, शरद पाटील, मोहन सूर्यवंशी, अमोल भोसले, गणेश कुंवर, महिला कर्मचारी सबा शेख यांनी केली.
या ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन करताना मिळून आलेल्या चार मुलांमुलींना असे कृत्य न करण्याची समज देऊन सोडून देण्यात आले. याप्रकरणी कॅफेमधील उमाकांत दिलीप अहिरराव व योगराज कैलास गुंजाळ (दोन्ही रा. जहागीरदारवाडी, चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले असून चौकशीअंती कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.