Water tanks in front of Shiv Sena office in Golani complex on the ground floor of the municipal seventeen storied administrative building.  esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेच्या बुडाखाली साचतेय पाण्याचे तळे; दुरुस्तीबाबत पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे डोळे बंद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराची विकासकामे जिथून चालतात, त्या महापालिका प्रशासकीय इमारतीखालीच गोलाणी संकुलात सत्ताधारी शिवसेना कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

पदाधिकारी आणि अधिकारी त्या ठिकाणी ये-जा करीत असतात. मात्र, कुणालाही त्याच्या दुरुस्तीची शिफारस करता येत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. (under municipal administrative building large amount of water accumulated jalgaon news)

महापालिकेची शहरात तब्बल २६ व्यापारी संकुले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही महापालिकेला मिळते. मात्र, या संकुलातील सुविधांकडे महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाहीत. महापालिका प्रशासकीय सतरा मजली इमारतीलगत असलेल्या गोलाणी संकुलाच्या सुविधांबाबतही महापालिका उदासीन आहे.

शिवसेना कार्यालयाजवळ तळे

महापालिका सतरा मजली इमारतीच्या तळमजल्यावर गोलाणी व्यापारी संकुलात शिवसेना कार्यालय आहे. याच कार्यालयासमोरून प्रशासकीय इमारतीत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिक, अधिकारी, शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी व नगरसेवकांची ये-जा सुरू असते. मात्र, या ठिकाणी टाईल्स तुटल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचे मोठे तळे साचले. आता त्या ठिकाणाहून ये-जा करणेही कठीण झाले आहे.

तातडीने दुरुस्ती होणार का?

महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याच पक्षाच्या कार्यालयाजवळ घाण असेल, तर शहरातील इतर ठिकाणचे काय चित्र असेल, याचा विचार करणे गरजेचे आहे. महापालिकेचे अधिकारीही याच ठिकणाहून जात असतात. त्यांनाही हे दिसत नसेल, तर प्रकार गंभीर आहे. त्यामुळे या ठिकाणची तातडीने दुरुस्ती होणार काय, याकडेच आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT