जळगाव : शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज (ता.१४) सकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली.
अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. दुपारनंतर मात्र उन्ह पडल्याने ढगाळ वातावरणातून मुक्तता झाली. (Unseasonal rains have damaged wheat and gram crops of farmers jalgaon news)
भुसावळला पहाटे तिनच्या सुमारास जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटासह पाउस झाला. पहाटे सहा ते सात दरम्यानही पाउस झाला. पावणे दहा ते दहाच्या सुमारास साकेगाव, नशिराबादला विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
अचानक सुरू झालेल्या पावसाने महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. रेनकोटअभावी अनेकांना पावसात भिजावे लागले.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
जळगाव शहरातही दहाच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नंतर ढगाळ वातावरण कायम होते.
दुपारनंतर उन्हाची तिव्रता वाढली होती. दरम्यान शहरासह जिल्हयात १३ ते १७ दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.अजून दोन दिवस काही ठिकाणी पाउस होईल असा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.