जळगाव : अवकाळी पावसाने ५ ते ७ मार्चदरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता सोमवार (ता. १३)पासून ते १७ मार्चदरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ‘आ’ वासून उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे. (Unseasonal raoin crisis again from today in district jalgaon news)
‘पश्चिमी विक्षोभ’, आणि ‘अल निनो’ यामुळे पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.
समुद्रातील तापमान वाढल्याने पावसाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे अवकाळी पाऊस पडेल. जिल्ह्यात काही ठिकाणी १३ ते १५, तर काही ठिकाण १४ ते १७ मार्चदरम्यान पावसाची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, दादर ही पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यांत झाले. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधित झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहू, मका, ज्वारी, सूर्यफूल, कांदासह केळी, पपई, मोसंबी, लिंबूचा समावेश होता.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
कापूस पडून आणि...
आता पुन्हा अवकाळीचे संकट असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अगोदरच शेतकऱ्यांचा ८० टक्के कापूस घरात पडून आहे. कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळण्यासाठी शेतकरी कापूस विकत नसल्याचे चित्र आहे.
सध्या साडेसात ते आठ हजारांचा कापसाला दर आहे. मात्र, अधिकचा भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी घरात कापूस साठविला आहे. खरिपातील उत्पादनखर्चही अजून निघालेला नाही. आता रब्बी हंगामावर अवकाळीचे दुसऱ्यांदा संकट येत आहे. यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.