The historic Urs celebration of Hazrat Sajanshah Wali (RA) is starting from tomorrow (19th) esakal
जळगाव

Jalgaon News : साकळीत हजरत सजनशाह वलींचा उर्स

सकाळ वृत्तसेवा

साकळी : येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासीक उर्स सोहळ्याला उद्यापासून (ता. १९) सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्सला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.

यानिमित्ताने उद्या (ता. १) दर्ग्याचे मुजावर सय्यद अहमद सय्यद मिरा यांच्या घरून बाबांच्या संदलची (चादर) सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. संदलनिमित्त बाहेरगावचे भाविक मोठ्या संख्येने साकळीत दाखल होत आहेत. (Urs of Hazrat Shahenshah Wali in Sangli Tradition of unity procession Qawwalis play Tomorrow Jalgaon News)

हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतीक असलेल्या येथील उर्सने गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपला आहे. प्राचीन काळी डांभूर्णी (ता. यावल) येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाई यांना हजरत सजनशाह वली (रहे.) बाबांनी बहीण मानून राखी बांधून घेतली होती. राखीची भेट म्हणून त्यांनी जमिनी दिल्या. तेव्हापासून वंशपरंपरेने या महिलेच्या परिवारातून आजही एकादशीला संदलनिमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझारवर चादर चढविली जाते.

ऐतिहासिक दर्गा

हजरत सजनशाह वली (रहे.) यांचा हा दर्गा ऐतिहासीक दर्गा म्हणून ख्याती प्राप्त करुन आहे. बाबांचे नाव शाह अ. लतीफ (रहे.) असे आहे. ख्याजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. बाबा शेकडो वर्षांपूवीं साकळी येथे आले होते. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. हा दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून त्याला लाकडाचा दरवाजा आहे. येथील उर्स उत्सवासाठी साकळी येथील अक्सा फाऊंडेशन तसेच हिंदू-मुस्लिम पंच कमेटी व दर्गा कमेटीचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती दर्गा खादीम सय्यद अरमान बाबा मुजावर (साकळी) यांनी दिली. विशेष म्हणजे दर्गा परिसरात उर्सनिमित्त पाच बाजार भरविले जातात. बाजारात विविध खाद्यपदार्थांपासून संसारोपयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत. या उर्स दरम्यान परिसरात उत्साहाचे व धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

आम लंगरचा (प्रसाद) व कव्वाली कार्यक्रम

संदल निमित्त सोमवारी (ता. १९) कय्युमशाह बाबा व त्यांचे सहकारी तसेच गावकऱ्यांच्या मदतीने दर्गा परिसरात लंगरचा कार्यक्रम (महाप्रसाद) ठेवला आहे. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २०) सुप्रसिद्ध कव्वाल सलीम जावेद (हैदराबाद) व कव्वालीन परवीन सुलताना (नागपूर) यांच्या कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आला आहे. या दोघांमधील हा सामना अतिशय रंगतमय होणार असून उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT