जळगाव : कोरोना महामारीवर कोरोना लसीकरण (Corona Vaccination) हाच प्रतिबंधक उपाय आहे. लसीकरणानंतर नागरिकांना झालेले फायदे लक्षात घेता कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. अनेकांनी पहिला व दुसरा दोघे डोस घेतले आहेत.
तिसरा बूस्टर डोस (Booster Dose) मात्र मिळत नव्हता. आता राज्य शासनाने बूस्टर डोसही मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने आज(ता. १५)पासून नागरिकांना बूस्टर डोसही मोफत मिळणे सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५ लाख ८८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Vaccine over 55 lakh citizens in district Booster Dose Free jalgaon latest Marathi news)
राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना आजपासून शासकीय लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस मोफत देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या लसीचा लाभ देण्यात येत आहे. जळगाव शहरातही महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात आजपासून लस देण्यास सुरूवात झाली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी जानेवारी २०२२ च्या सुरूवातीलाच ‘बूस्टर’ डोस दिला जात होता. परंतु त्यासाठी त्यांना खासगी रुग्णालयात लसीकरण (सशुल्क) उपलब्ध होते. खासगी लसीकरण केंद्रे शहरी भागात, जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे बूस्टर डोस शहरांपुरते मर्यादित राहिले होते.
आता केंद्रीय आरोग्य विभागाने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले असून पुढील ७५ दिवस मोफत उपलब्ध असणार आहे. जळगावसह जिल्ह्यातील विविध शासकीय केंद्रांवर मोफत ‘बूस्टर’ डोस उपलब्ध होणार आहे.
बूस्टर डोसबाबत शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज, मॉल, आठवडे बाजार, गणेशोत्सवात मंडळातर्फे लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे.
बूस्टर डोस अठरा वर्षावरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोसनंतर सहा महिने किंवा २६ आठवड्याचा कालावधी पूर्ण केलेला असावा, अशी अट आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
प्रथम डोस घेतलेले---३० लाख १८ हजार ५४९
दुसरा डोस घेतलेले-- २४ लाख ४४ हजार ८९८
एकूण--५४ लाख ६३ हजार ४४७
"‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’अंतर्गत शासन निर्देशानुसार १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर अठरा वर्षावरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष लसीकरण शिबिर घेण्यात येतील. गणेशोत्सवादरम्यान सर्व गावांमध्ये विशेष लसीकरण शिबिर होतील. "- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.