Jalgaon Crime News : महामार्गावरील पेट्रोलपंप, हॉटेल व ढाब्यांवर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वरणगाव पोलिसांनी शिताफीने गजाआड केले आहे.
आयशर ट्रकसह ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, राजेश उर्फ बापू निवृत्ती शिंदे (वय ५०, रा. अन्नपूर्णानगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव परिसरात या संशयिताना याच वाहनाद्वारे डिझेल चोरी प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झाली आहे. (Varangaon police action against steal diesel from truck jalgaon crime news)
वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत बोहार्डी शिवारात सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्यासह पथक बुधवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या दरम्यान रात्री गस्तीवर असताना फौजी ढाब्याजवळ एक आयशर ट्रक (क्रमांक एमएच ०४, डीके ७१७०) संशियतरित्या फिरत असल्याचे आढळून आले.
वाहनचालक अन्सार अहमद नसरुद्दीन मन्सुरी (वय ३८, रा. जयपूर, बनारस, उत्तर प्रदेश), रईस हसीम शेख (रा. भिवंडी), अनिल सुभाष सरोदे (रा. भिवंडी) याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने संशयिताना वाहनासह पोलिस ठाण्यात आणत असताना रईस शेख व अनिल सरोदे दोघे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले.
वाहनात कुठलाही माल नसताना गाडी खाली असताना संशयित पळाल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. वाहनाची पोलिस ठाण्यात बारकाईने तपासणी केली असता गाडीच्या केबिनमागील बॉडीला समोरील बाजूस १ हजार लिटरची टाकी तयार केल्याचे आढळून आले. टाकीच्या वरील भागात इलेक्ट्रीक मोटारची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या मोटारच्या सहाय्याने समोरील वाहनातील डिझेल टाकीतील डिझेल ओढून चोरी करीत असल्याचे समोर आले.
त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी राजेश उर्फ बापू निवृत्ती शिंदे यांच्या मालकीचा ट्रकचे (क्रमांक एमएच १९, सीवाय २७७७) डिझेल टाकीचे झाकण तोडून बुधवारी (ता. १२) रात्री अकराच्या दरम्यान ४०० लिटर डिझेल (किंमत ३६ हजार रुपये) मोटारच्या सहाय्याने चोरल्याची कबुली दिली असता राजेश उर्फ बापू शिंदे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रईस हसीम शेख, अनिल सुभाष सरोदे या फरार संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत तर गुन्ह्यातील दोन बॅटरी पाच हजार रुपये, इलेक्ट्रीक मोटार ५ हजार रुपये आणि ४ लाख रुपये किमतीचा ट्रक असा ४ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट कर्मचारी नावेदअली सय्यद तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.