Colleagues of Vardhishnu Sanstha's 'Anandghar' project engaged in teaching life skills to underprivileged children.  esakal
जळगाव

Inspirational News : पाचशेवर वंचित मुलांना आनंददायी बालपण! वर्धिष्णूच्या ‘आनंदघर’ची दशकपूर्ती

सकाळ वृत्तसेवा

Inspirational News : कचरा वेचणाऱ्या, बालमजुरीच्या अपरिहार्य बनलेल्या पाशात अडकलेल्या सेवावस्तीतील वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे बालपण आनंददायी करणाऱ्या वर्धिष्णू संस्थेच्या ‘आनंदघर’ प्रकल्पाची शनिवारी (ता. २४) दशकपूर्ती.

गेल्या दहा वर्षांत ‘वर्धिष्णू’ने पाचशेवर मुलांना त्यांच्या हरविलेल्या बालपणातून बाहेर काढत ‘आनंदघर’ दिले आणि बघता बघता या मुलांचे आयुष्यंच बदलून गेलंय. (Vardhishnu Sanstha Anandghar project completes decade on today jalgaon news)

समाजात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. त्यांची ही सेवाकार्ये नुसतीच ‘इव्हेंट’ बनलीय. अर्थात, त्यालाही अपवाद असून, समाजाची गरज ओळखून त्या क्षेत्रात सेवेचे व्रत जोपासणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वर्धिष्णू.

अशी झाली रूजूवात

सेवावस्तीतील (झोपडपट्टी) अनेक मुले कचरा वेचतात, बालमजूर म्हणून काम करतात. त्यांच्या शिक्षण व आरोग्याचा प्रश्‍न खूप मोठा. या प्रश्‍नावर काम करण्याचे अद्वैत दंडवते या युवकाने ठरवले.

वर्धिष्णू नावाने संस्था स्थापन करून अद्वैत यांनी ‘आनंदघर’ची संकल्पना मांडली. केवळ मांडलीच नव्हे, तर त्यावर अभ्यास करत या वंचित मुलांना त्यांच्या हक्काचे आनंददायी बालपण कसे देता येईल, यासाठी काम सुरू केले

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी आहे संकल्पना

२०१३ मध्ये श्री. दंडवते यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन ‘आनंदघर’ची सुरवात केली. समाजातील वंचित मुलांना शोधून सुरवातीला त्यांना स्वच्छता व पर्यायाने आरोग्य, जीवन कौशल्ये आणि शिक्षणाचे धडे दिले जातात. वर्षभर ‘आनंदघर’मध्ये हे पाठ गिरविल्यानंतर या मुलांना शाळेत दाखल केले जाते. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अद्वैत यांची टीम त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करते.

पाचशेवर मुलांना शिक्षण

‘आनंदघर’चा प्रवास रामेश्‍वर कॉलनीतील मरिमाता मंदिरापासून सुरू झाला. या भागातील वंचित मुला-मुलींना मंदिरातच वर्धिष्णूच्या टीमने धडे दिले. नंतर संस्थेचे हे कार्य वाढत गेले आणि आजवर संस्थेने जवळपास पाचशेवर मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

त्यापैकी जवळपास ४२ मुलांनी दहावीच्या परीक्षेचा टप्पाही ओलांडला असून, ती उच्च शिक्षण घेत आहेत. जळगाव शहरातील मेहरुण, समतानगर, तंट्याभिल यासह अमळनेर व चोपडा आदी ठिकाणी संस्थेचे हे सेवाकार्य सुरू आहे.

आरोग्याचीही काळजी

शिक्षणासोबतच या मुलांच्या आरोग्याचीही काळजी संस्थेकडून घेतली जाते. त्यासाठी त्यांना स्वच्छतेचे धडे, वर्षभरात तीन शिबिरांद्वारे त्यांच्या आरोग्य तपासणी आणि ‘आनंदघर’मध्ये असताना, दररोज राजगिऱ्याचे लाडू, चिक्की व केळी, असा पोषक आहारही दिला जातो. स्वत: अद्वैत व त्यांच्या पत्नी प्रणाली शिसोदिया यांच्या नेतृत्वात २० जणांची टीम यासाठी कार्यरत आहे.

"समाजात खूप प्रश्‍न आहेत. त्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर आपल्याकडे नसले, तरी त्यापैकी गंभीर असलेल्या वंचित मुलांच्या समस्येवर आम्ही काम सुरू केले. त्यात समाजातील घटकांच्या मदतीने काहीतरी योगदान देता आले. पुढेही हे कार्य वाढवायचे आहे. मुलांना आनंददायी बालपण अन्‌ शिक्षण देण्याचे हे व्रत अविरत सुरूच राहील." -अद्वैत दंडवते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT