Jalgaon News : ‘येरे येरे पावसा...पासून आला आला वारा...पर्यंत विविध गाणी म्हणत ज्येष्ठ नागरिक आपले वय विसरून मनोरंजनात्मक खेळात चांगलेच रमून गेले.
येथील महिला क्रीडा मंडळातर्फे गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. (Various competitions were organized by the Women Sports Board in Gurudev senior Citizen Association jalgaon news)
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती देताना महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी म्हणाल्या, की आम्ही दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या वयाला मानवतील, असे ‘आऊटडोअर’ खेळ घेतो. यंदा पाऊस असल्याने ‘इनडोअर’ खेळ घेण्याचा निर्णय घेतला. यात मनोरंजनात्मक व सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा होती. त्यासाठी पाच गट केले.
या गटांना विविध लेखक व कवींची नावे देण्यात आली. चिठ्ठी टाकून त्या चिठ्ठीत जो शब्द निघेल, तो शब्द ज्या गाण्यात असेल ते गाणे म्हणायचे. आपल वय विसरून ज्येष्ठांनी अक्षरशः धमाल केली. याशिवाय राजकारण, सिनेमा व ज्येष्ठांसाठी सरकारच्या योजना यावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
या वेळी सचिव महादेव हरिमकर यांनी सूत्रसंचलन केले. तर जयश्री ओक यांनी स्पर्धेचे संचलन केले. सचिव लता होसकोटे यांनी विविध गट करून खालिल साहित्यिकांची नावे गटाला दिली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी, पु. ल. देशपांडे ना. धों. महानोर, कुसुमाग्रज, केशवसुत, मंगेश पाडगावकर या नावाने गट केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लता होसकोटे, प्राची राणे, मंगला पाटील, किरण चौधरी, स्वाती भोळे, विनिता नेवे, रश्मी ठोसर यांनी स्पर्धा घेण्यात मदत केली. या मध्ये मराठी, हिंदी गाणी व विविध विषयांवर प्रश्न विचारून ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या. सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या नंतर बक्षिसे देण्यात आली. विजेते ग्रुपचे मेंबर्स, रामकृष्ण पाटील, एन. के. पाटील, दिनकर जावळे, विजय चौधरी, साधना हरिमकर, सुशीला पाटील यांनी बक्षिसे पटकावली. सचिव महादेव हरीमकर व दिनकर जावळे यांनी सूत्रसंचलन केले.
या प्रसंगी महिला क्रीडा मंडळच्या आरती चौधरी, लता होस्कोटे, जयश्री ओक, प्रभा पाटील, प्राची राणे, किरण शुक्ला, राजश्री कात्यायनी, अनिता कवडीवाले, मंगला पाटील, स्वाती भोळे, रश्मी ठोसर, किरण चौधरी, विनीता नेवे, वैशाली पाटील, विजया निकम, दीपाली सराफ आदी उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.