जळगाव : वटसावित्रीच्या (Vat Savitri Purnima) सणाचे औचित्य साधत सुवासिनींनी वृटवृक्षाचे पूजन करत, त्यास प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सोबतच वडाच्या झाडाचे रोपण (Plantation) करुन त्याच्या संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली. वटसावित्रीच्या सणाला हिंदू, विशेषत: महाराष्ट्रातील महिलांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्त पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मंगळवारी (ता. १४) या सणाचे औचित्य साधून महिलांनी वटवृक्षाचे (Banyan Tree) पूजन केले. वडाच्या झाडाला सुताचा धागा गुंडाळत त्यास प्रदक्षिणाही घातल्या. (Vat Savitri Purnima married women worship banyan tree did plantation Jalgaon News)
वृक्षारोपणाने साजरा
वड हा आपल्या सावलीत, सानिध्यात अनेक जिवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो. या वृक्षाची सर्वात दाट सावली असते. आयुर्वेदातही या वृक्षाचे महत्त्व आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेचे औचित्य साधून समर्पण संस्था संचालित श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात महिला पालकांच्या हस्ते शहरातील विविध परिसरात वडाच्या झाडाची रोपे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना नन्नवरे सरला गिरासे, ऋतुजा घीर्निकर, रेखा देशपांडे, कल्पना व शीतल चव्हाण, मनीषा पाटील, प्रा. अस्मिता सोनवणे, शिक्षिका माधुरी पाटील, पूजा पाटील, पिंप्राळा शिवारातही माजी नगरसेविका ज्योती इंगळे, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.