On Friday around 3.30 am in Ganapatinagar damage caused due to cars being set on fire. esakal
जळगाव

Crime Update : शहरात वाहने पेटवून देण्याचे सत्र सुरूच !

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात वाहनतळ, गल्लीत लावलेली वाहने पेटवून देण्याचे सत्र सुरूच असून, गणपतीनगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटीत एकाच गल्लीतील दोन कार व दुचाकी अशी तीन वाहने अज्ञात माथेफिरूंनी पेटवून दिली.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार पेटवून देताना अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.(Vehicle burning session continues in city Three vehicles burnt criminal show in cctv case registered Jalgaon Crime News)

गणपतीनगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटीत व्यावसायिक मिलन सलामतराय तलरेजा (वय ३०) कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी (ता. २८) पहाटे साडेतीन वर्षांच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कापडावर पेट्रोल टाकून कार (एमएच १९, डीव्ही ४१९३) पेटवून दिली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी फोन करून कारला आग लागण्याची माहिती तलरेजा यांना दिली.

त्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत कारचे जळून नुकसान झाले होते. तलरेजा यांनी आठ महिन्यांपूर्वीच कार खरेदी केली होती. त्याच पद्धतीने त्यांच्याच गल्लीत राहणारे श्रीचंद घनश्यामदास अडवानी (वय ४७) यांचीदेखील कार (एमएच १९, सीझेड २२७७) आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी (एमएच १९, डीझेड ७२४४) यांच्यावरदेखील त्याच पद्धतीने डिझेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले.या संदर्भात मिलन तलरेजा यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT