Guardian Minister Gulabrao Patil and Minister Anil Bhaidas Patil while discussing with farmers. esakal
जळगाव

Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक; अडविला मंत्र्यांचा ताफा

सकाळ वृत्तसेवा

Gulabrao Patil News : अमळनेर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने हा तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री अनिल भाईदास पाटील हे जात असताना त्यांना अडवले.

दोन्ही मंत्री शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत असताना एकाने ‘हे काहीच करणार नाही’ असे गर्दीतून बोलताच मंत्री गुलाबराव पाटील चिडले व त्यांच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये काहीशी शाब्दीक चकमकही उडाली.(Verbal clash between Gulabrao Patil and farmers jalgaon news)

आज घडलेल्या या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु होती. निम (ता. अमळनेर) येथील कपिलेश्वर मंदिराच्या सभागृह आणि पांझरा नदीवरील पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे जात असताना हा प्रकार घडला.

मारवड गावातील शेतकरी नेते शिवाजीराव पाटील यांच्यासह स्थानिक काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडवला. अमळनेर तालुक्यात अनेक दिवस पावसाचा खंड होता. पुरेसा पाऊस पडला नाही तरी अद्याप तालुका दुष्काळी का जाहीर होत नाही, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तीन महिने उलटले तरी मिळत नाही अशा मागणीचे निवेदन दोन्ही मंत्र्यांना देण्यात आले.

त्यावर कायदेशीर बाबी मंत्री अनिल पाटील हे गुलाबराव पाटील यांना समजावून सांगत असताना मध्येच एकाने ‘हे काहीच करणार नाहीत’ असा आवाज दिला. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील चिडले. मंत्री चिडताना पाहून शिवाजीराव पाटील यांनी ‘तुम्ही मंत्री आहात, शेतकरी आपली व्यथा मांडत असताना त्यांच्यावर संतापणे योग्य नाही’ असे बोलल्यावर दोघांमध्ये खडाजंगी झाली.

शाब्दिक चकमक जोरात होऊ लागताच मंत्री अनिल पाटील शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी मोबाईलमध्ये या सर्व घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. पोलिसांनी अधिक वाद होऊ नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मंत्र्यांचा ताफा तेथून हलविला. मात्र, शिवाजीराव पाटील यांना ताब्यात घेऊन दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रस्ता अडवला म्हणून कारवाई

दरम्यान, गुलाबराव पाटील हे मंत्री असताना त्यांनी दमदाटी करणे योग्य नाही. शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता, त्यांनी उलट शेतकऱ्यांनाच केलेल्या अरेरावीबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेप्रकरणी शिवाजीराव पाटील यांनी बेकायदेशीरपणे मंत्रिद्वयांचा रस्ता अडवला म्हणून त्यांच्यावर मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असल्याचे मारवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले.

''आम्ही शेतकऱ्यांचे म्हणणे शांततेने ऐकून घेत असताना व कायदेशीर प्रक्रियेवर चर्चा करीत असताना शिवाजी पाटील यांनी विनाकारण गोंधळ घातला.''- अनिल भाईदास पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT