Murder sakal
जळगाव

धुळे : राजकारणी-प्रशासनाच्या बेपर्वाईचा बळी!

साक्रीत भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडूनही प्रतिबंधात्मक कारवाईचा अभाव; कायद्याचा धाकही नाही

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

धुळे : निवडणूक कुठलीही असो डोळ्यांत तेल घालून सरकारी यंत्रणेला काम करावे लागते आणि भान, संयम राखत राजकीय मंडळींना वावरावे लागते. यात थोडी जरी कुचराई, बेपर्वाई झाली की अनुचित प्रसंगांना सामोरे जावे लागते. याचा धगधगता अनुभव सध्या साक्रीसह धुळे जिल्हा घेत आहे. साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर निरपराध तरुण महिलेचा बळी गेला आहे. तिला न्याय मिळणे तर दूरच, याउलट तिचा मृत्यू कसा झाला आणि त्यात राजकारण कसे शिजतेय? अशा आरोपात राजकीय मंडळी गुंतल्याने असंवेदनशीलतेचा कळस पहावयास मिळतो आहे.

हाणामारीचा पहिला प्रसंग

साक्री नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाताना मंगळवारी (ता.१८) भाजपचे सरचिटणीस शैलेश आजगे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. आजगे हे प्रभाग १३ चे उमेदवार, बूथ प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभाग १२ मध्ये नियुक्ती आणि वाद झाला प्रभाग १४ मध्ये. नियुक्त बूथस्थळीच आजगे यांनी थांबावे यासाठी त्यांना खुद्द तहसीलदारांनीही समज दिली होती. तरीही फरक न पडल्याने संयम सुटून प्रभाग चौदामध्ये दुपारी शिवसेना कार्यकर्ते व आजगे यांच्यात हाणामारी झाली. त्यावेळी तेथे गर्दी झाली.

ड्रामा अन्‌ आदेशाचा भंग

उमेदवार आजगे यांना झालेल्या मारहाणीचे भाजपने लागलीच भांडवल केले. त्यांच्या हातापायाला, डोक्याला बँडेज बांधून त्यांना जखमी अवस्थेत दाखवून भाजपच्या धुळे शहर व साक्रीतील संबंधित पदाधिकाऱ्यांनी एक इमोशनल ड्रामा केला. त्यात आजगे यांना साक्री शहरात हिंडविले. या अवस्थेत त्यांना साक्री पोलिस ठाण्यासमोर नेले. तेथे भाजपच्या जमावाने या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली, असा जाब विचारला. प्रत्यक्षात आजगे यांनी मारहाणीबाबत पोलिसांकडे तक्रार दिली नाही. यात जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक, मनाई आदेश लागू असतानाही त्याचा उघडपणे भंग होत असल्याचे निदर्शनास येऊनही जबाबदार पोलिस व महसूली अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे निवडणुकीवेळी साक्रीत कायद्याचा धाकच उरला नसल्याचे चित्र समोर आले.

मग बळी गेलाच कसा?

या पार्श्वभूमीवर कर्तव्य कठोर होऊन पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, निरीक्षक दिनेश आहेर आणि प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी लागलीच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पावले उचलली असती, तर कदाचित निकालाच्या दिवशी बुधवारी (ता.१८) जल्लोष, मिरवणूक, सत्काराचे कार्यक्रमही टळले असते. त्यातून निरपराध महिलेचा बळीही गेला नसता, असा जनमानसात सूर आहे. यात विशेष म्हणजे प्रभाग चौदामध्ये मतदानाच्या दिवशी हाणामारी झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्येही झळकले होते. त्याआधारे पोलिस व महसूली यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हाताखालील अधिकाऱ्यांकडून साक्री येथे निकालाच्या दिवशी नेमक्या काय प्रभावी उपाययोजना राबविल्या व कशा स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई केली याबाबत आढावा घेतला असेल असे मानूया. मग असे असतानाही निरपराध महिलेचा बळी गेलाच कसा हा प्रश्‍न उरतो.

अधिकारी, गुप्तचर यंत्रणा फेल?

साक्रीत शिवसेना नेते नाना नागरे यांना भाजपचे कडवे आव्हान, काँग्रेसची स्वबळावर लढत, शिवसेना व राष्ट्रवादीची आघाडी, पडद्यामागे अनेक संवेदनशील घडामोडी घडत असताना मतदानाच्या दिवशी भाजप व शिवसेनेच्या वादातून पडलेली ठिणगी निकालावेळी पेट घेऊ शकते याचा अंदाज बांधण्यात जबाबदार पोलिस व महसूली अधिकारी का अपयशी ठरले हा संशोधनाचा विषय ठरतो आहे. तसेच गुप्तचर यंत्रणाही नेमकी काय करत होती हाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT