Executive Chairman of State Education Institutions Corporation and former Union Minister Vijay Naval Patil  esakal
जळगाव

SSC HSC Exam 2024 : दहावी- बारावीच्या परिक्षेवरील बहिष्कार मागे !

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत शासनाने सकारात्मक धोरण स्वीकारल्यामुळे राज्यातील संस्था चालकांनी परिक्षावरील बहिष्कार मागे घेतल्याची माहिती राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी मंगळवारी (ता.१३)दिली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत शासनाने सकारात्मक धोरण स्वीकारल्यामुळे राज्यातील संस्था चालकांनी परिक्षावरील बहिष्कार मागे घेतल्याची माहिती राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी मंगळवारी (ता.१३)दिली.

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांनी त्याच्या मालकीच्या इमारती दहावी- बारावीच्या परिक्षेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार नाही. (Vijay Naval Patil informed that boycott of 10th 12th examinations withdrawn jalgaon news)

असा एक मुख्य निर्णय घेऊन बहिष्काराचे घोषणा गेल्या महिन्यात केलेली होती. जो पर्यंत शासन शिक्षण संस्थाच्या प्रमुख मागण्याचे निराकरण करत नाही. तोपर्यंत हा धोरणात्मक निर्णय घेतला होता. शासनास तसा इशारा देखील दिला होता.

या पत्राची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल (ता.१२) राज्यातील अर्थविभागातील संस्था चालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्याची बैठक आयोजित केली होती.

बैठकीत कार्याध्यक्ष विजय नवल पाटील, माजी आमदार विजय गव्हाणे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन काही निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यामध्ये सर्व प्रथम वेतनेतर अनुदान येत्या मार्चपर्यंत निर्गमित करण्याचा आदेश तत्काळ काढण्यात येईल.

लिपिक व प्रयोगसहाय्यक पदांना भरती करण्यासाठी ना हरकरत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल. मराठी माध्यमाच्या शाळांना मराठी भाषेचा विकास करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल, प्रत्येक तीन महिन्यानंतर संस्था महामंडळाचे पदाधिकारी व शिक्षण मंत्री यांच्या समवेत बैठक आयोजित केली जाईल.

त्यामध्ये खासगी शिक्षण संस्थांचे निराकरण केले जाईल. पवित्र पोर्टलची शिक्षण संस्थाच्या भरती प्रक्रियेमध्ये संस्था चालकाचे अधिकार अबाधित ठेवले जातील. राज्यातील ज्या शिक्षण संस्थाच्या १०० च्या वरती शिक्षण संस्था असतील, अशा प्रकाराच्या शिक्षण संस्थाना शिक्षण मंत्र्याच्या बैठकीत बोलविले जाईल.

प्रति वर्षी दिले जाणारे वेतनेतर अनुदान काही अंशी वाढविण्याचे मान्य केले आहे. सर्व मागण्याच्या बाबतीत शासनाने सकारात्मक धोरण स्वीकारल्यामुळे संस्था चालकांनी परिक्षेवरील बहिष्कार मागे घेतल्याची घोषणा कार्याध्यक्ष विजय नवल पाटील यांनी संपूर्ण राज्यासाठी केलेली आहे. त्या स्वरूपाचे पत्र संस्थाचालकांच्या वतीने प्रसिद्धीसाठी दिलेली आहे. त्यामुळे आता दहावी बारावीच्या परिक्षा सुरळीत पार पडतील, असा आत्मविश्वास शिक्षक व पालकांना आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT