Bhumi Pujan by MP Unmesh Patil  esakal
जळगाव

Jalgaon News : वालझिरी तीर्थक्षेत्रात एक कोटीतून विकासकामे; परिसराचा होणार कायापालट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र वालझिरी परिसरात नव्हे तर देशात सुपरिचित आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात या भाविकांना अधिकाधिक सुखसुविधा मिळाव्यात, यासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पर्यटन निधीतून एक कोटी रुपये विकासासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

भाविकांच्या विविध सोयीसुविधांसह या परिसराचा कायापालट केला जाईल, अशी ग्वाही खासदार उन्मेश पाटील यांनी दिली.

वालझिरी येथे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (ता. १७) खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते झाला. ( Walziri pilgrimage area will undergo transformation jalgaon news)

याप्रसंगी मार्केट कमिटी माजी सभापती मच्छिंद्र राठोड, पंचायत समिती माजी सदस्य बाळासाहेब राऊत, उपसभापती सुनील पाटील, ओबीसी प्रदेश सचिव रमेश सोनवणे,जिल्हा भाजप सचिव ॲड. प्रशांत पालवे, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, रा. वी. संचालक प्रमोद पाटील, उपविभागीय अभियंता सुपले, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश गजे, संजय चौधरी, चेअरमन संतोष देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, माजी सरपंच संतोष देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरूवातीला खासदार पाटील यांच्या हस्ते येथील महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व संचालकांच्या हस्ते खासदार पाटील यांचा तुकाराम गाथा व तुळशी माळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव सतीश देशमुख यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, की खासदार उन्मेश पाटील यांनी मागणीनुसार तत्काळ निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल संस्था ऋणी राहील.

..अन् शब्द पाळल्याने आनंद

याप्रसंगी माजी सभापती मच्छिंद्र राठोड, आदर्श शेतकरी बाळासाहेब राऊत, मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी खासदार पाटील यांच्या तालुक्यातील आध्यात्मिक तीर्थक्षेत्रासाठी सुरू असलेल्या धडाडीचे कौतुक केले. अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व तीर्थक्षेत्राचा विकास होत असताना हे क्षेत्र राहून गेल्याची खंत माझ्यासह खासदारांना देखील होती. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या भेटीत त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचा दिलेला शब्द आज पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, असे सांगितले.

याप्रसंगी पिंपरखेड सरपंच शेख दिलफरोज, सांगवी सरपंच संतोष राठोड, पिंपरखेड तांडा सरपंच अरविंद चव्हाण, माजी सरपंच प्रदीप भोसले, राजेंद्र भोसले, योगेश चव्हाण, इरफान शेख, उमेश आव्हाड, वाडिलाल चव्हाण, सुदाम चव्हाण, मंगतू चव्हाण, संतोष मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत देशमुख, खजिनदार रघुनाथ जगताप, पांडुरंग आगोणे, विजय भोसले, शंकरराव पवार, माधवराव पाटील, मुरलीधर भोसले, संतोष देशमुख पिंपरखेड, अशोक भोसले, इंजि. प्रशांत देशमुख, ॲड. रणजीत पाटील, विजय ठुबे, जयवंतराव देशमुख, दीपक गुरव, रवी राजपूत, सौरव पाटील, कल्पेश मालपुरे, अमित सुराणा, कल्पेश महाले, मयूर साळुंखे, सुनील रणदिवे,सर्वेश पिंगळे, मुकेश गोसावी, चेतन वाघ स्वप्नील मोरे आदी उपस्थित होते. पत्रकार मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र राजपूत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वारकरी बांधवांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT