Conceptual drawing of Varkari Bhavan architecture in Khedi area esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावलगत खेडी शिवारात साकारणार वारकरी भवन; 150 भक्तांची निवासव्यवस्था

हाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यातून असंख्य दिंड्या, पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरकडे जात असतात.

- सचिन जोशी, जळगाव

Jalgaon News : महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यातून असंख्य दिंड्या, पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरकडे जात असतात. त्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जळगाव शहरालगत वारकरी भवन साकारत आहे.

आगामी नववर्षात भवनाची वास्तू सज्ज होईल. (Warkari Bhawan will be built in Shiwar village near Jalgaon news)

वारकरी संप्रदायाची परंपरा जशी महाराष्ट्राला आहे, तशी ती जळगाव जिल्ह्यालाही असून जिल्ह्यातील शेंदुर्णी, अमळनेर ही क्षेत्र प्रतिपंढरपूर मानली जातात. संत मुक्ताई मंदिर, जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानातून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी वारी जाते. अमळनेर येथील पूज्य सखाराम महाराजांच्या वाडीतील वारीही त्याचाच भाग आहे.

त्यामुळे खानदेशात व जळगाव जिल्ह्यातील वारकरी राज्याच्या वारकरी परंपरेत मोठे योगदान देत आहेत. वारकऱ्यांसाठी जळगावमध्ये एखादे भक्तनिवास, भवन असावे, यासाठी वारकरी प्रयत्नशील होते. स्थानिक प्रशासन, पालकमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळस्तरावर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

भवनातील समोरून दिसणारे सभागृहाचे संकल्पचित्र.

नियोजन समितीतून निधी मंजूर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वारकऱ्यांसाठी भवन असले पाहिजे, अशी भावना गेल्यावर्षी व्यक्त करीत जिल्हा नियोजन विकास समितीतून त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार या कामासाठी आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून भवनाचे काम साकारणार आहे. ;

ट्रस्टकडे सोपविणार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वारकरी भवनाची वास्तू साकारणार आहे. वास्तू पूर्ण झाल्यानंतर हे भवन वारकऱ्यांच्या ट्रस्टकडे सोपविण्यात येईल. या ट्रस्टद्वारा भवनाचा कार्यभार चालविला जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

असे असेल भवन

खेडी शिवारात एक एकर जागेत हे वारकरी भवन साकारत आहे. त्यात शंभर ते दीडशे वारकरी एकावेळी थांबू शकतील, अशी व्यवस्था असेल. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांसाठी एक मोठे सभागृह, वारकऱ्यांना मुक्कामासाठी पंधरा ते सोळा स्वतंत्र खोल्या, बैठकीसाठी एक ‘कॉन्फरन्स हॉल’, ‘डॉर्मेट्री’ अशी व्यवस्था या ठिकाणी असेल. प्रत्यक्ष वास्तूच्या सभोवताली खुल्या जागेत वृक्ष लागवड, उद्यान केले जाईल. भवन परिसरात अथवा सभागृहात महाराष्ट्रातील संत परंपरेची ओळख दर्शविणारी चित्रे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT