waste water was discharged in open plot in side group jalgaon news gbp00 esakal
जळगाव

Jalgaon News : सांडपाण्याचा रात्रीत झाला तलाव; मंजूरी असताना गटारी अपुर्ण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील द्वारकानगर परिसरात गटार बांधकामात गौडबंगाल सुरू असून, एका गटातील सांडपाणी बाजूच्‍या गटातील मोकळ्या प्‍लॉटमध्‍ये सोडून दिले आहे. (waste water was discharged in open plot in side group jalgaon news)

यामुळे रात्रभरातच येथे सांडपाण्याचा तलाव झाला असून, गटारींचे असे सुरू असलेले काम बंद पाडण्याची मागणी द्वारकानगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिक सोमवारी (ता. ८) मनपा आयुक्‍तांना निवेदन देणार आहेत.

शहरातील निमखेडी शिवारात द्वारकानगरच्‍या गट क्रमांक ११८/४ मध्‍ये गटारींचे काम सुरू आहे. परंतु, या गटारीतून जाणारे सांडपाणी मुख्‍य गटारीला न जोडता ते ११८/५ गटातील मोकळ्या प्‍लॉटमध्‍ये सोडले आहे. इतकेच नाही, तर ११८/६ मध्‍ये असलेल्‍या लहान गटारीत हे पाणी उतरविण्यासाठी कच्‍ची चारी कोरून ते सोडण्याचा घाट सुरू आहे. मात्र, नागरिकांनी जेसीबीद्वारे सुरू असलेले हे काम शुक्रवारी (ता. ५) बंद पाडले.

आरोग्याचा प्रश्‍न

खोटेनगर, हिरा-शिवा कॉलनी, द्वारकानगरचा गट ११८/४ या भागातील सुमारे दीड हजार घरांचे सांडपाणी उपगटारीत जोडण्याचे अजब काम मनपाकडून सुरू आहे. अर्थात हे सांडपाणी मुख्‍य गटारीला जोडणे अपेक्षित असताना असे काम केले जात नाही. हे संपुर्ण पाणी मोकळ्या प्‍लॉटमध्‍ये सोडण्यात आले आहे. यामुळे रात्रभरातच प्‍लॉटमध्‍ये तलावाचे स्‍वरूप आले आहे. यामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मंजुरी, मग गटारी का नाही?

द्वारकानगरातील ११८/४ या गटातील गटारींच्‍या कामासाठी १० लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. तरीदेखील संपुर्ण गटातील गटारींचे काम केले जात नसून, ते अपुर्णावस्थेतच आहे. यात मुख्य रस्‍त्‍यावरील गटारीचा अद्याप विचारदेखील नाही. यात कच्‍ची चारी कोरून सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे दहा लाखाच्‍या निधीत केवळ एकाच रस्‍त्‍यावरील काम झाल्‍याचे पाहावयास मिळत आहे.

इंजिनिअर म्‍हणतात... पाणी इकडेच उतरविणार

या भागात जेसीबीद्वारे चारीचे खोदकाम सुरू असताना नागरिकांनी ते रोखले. या वेळी येथे असलेले योगेश वाणी या अभियंत्याने परिसरातील नागरिकांशी दादागिरीची भाषा करत, हे सांडपाणी इकडेच उतरणार, दहा वर्ष त्रास सहन केला तसाच आताही सहन करा, असे सांगितले. तसेच तुमच्‍या घरांचे बांधकाम अतिक्रमणात असल्‍याची भाषा वापरल्‍याचे येथील नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT