A water fountain bursts in front of Ashok Kirana in Mehrun  esakal
जळगाव

Jalgaon News : मेहरूणमध्ये अमृत योजनेची जलवाहिनी फुटली; उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी जळगाव महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या अमृत योजनेची मुख्य जलवाहिनी मेहरुण परिसरात सोमवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. (Water pipe of Amrit Yojana burst in Mehrun jalgaon news)

गेल्या पाच ते सात वर्षांपासून जळगाव शहरात गटारी व रस्ते नाहीत. कुठल्याही मुलभूत सुविधा देण्यास स्थानिक प्रशासन समर्थ नसल्याचे दिसून येत आहे. वाघूर धरणात मुबलक साठा असताना, जळगावकरांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासही यंत्रणा सक्षम नाही. पाच वर्षांपासून जळगावकर अमृत योजनेच्या नावाखाली नको-नको तो त्रास भोगतोय.

जेमतेम यंदा तरी अमृत योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळेल, अशा अपेक्षा होती. योजना पूर्णत्वास आली असून, घराघरांत पाणीपुरवठा होईल, अशी तयारी असताना, योजनेंतर्गत टाकलेली मुख्य भूमिगत जलवाहिनीसह उपजोडण्या वारंवार खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळित होत आहे.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मेहरूणमधील अशोक किराणा दुकानासमोर मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व फुटला. त्यातून तब्बल साडेतीन तास पाण्याची नासाडी झाली. याबाबत मेहरूण परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार संपर्क केला. मात्र, कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पाणीपुरवठा विस्कळित होणार

आदर्शनगरात माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या निवास्थानाजवळ मुख्य जलवाहिनी फुटून आदर्शनगर, गणपतीनगर, महाबळ, संभाजीनगर, कोल्हे हिल्सचा परिसर, एम. जे. कॉलेज परिसर, जयनगर आदी ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही.

सोमवारी श्री. रायसोनी यांच्या घराजवळील काम पूर्ण होऊन मंगळवारी (ता. ११) सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा असताना, मेहरूणमधील मुख्य जलवाहिनी फुटून या भागातील आणि उर्वरित शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे.

अभियंता नॉटरिचेबल

मेहरूणमधील अमृत योजनेची मुख्य जलवाहिनी फुटल्याची माहिती देण्यासाठी परिसरातील रहिवासी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मुख्य अभियंता संजय नेमाडे (७५८८६१३८०१) यांनी रात्री साडेआठपर्यंत फोनच रिसीव्ह केला नाही. मुख्य अभियंताच प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT