Wheat sowing going on in district  esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात गहू, हरभरा, मका पेरणीला वेग; अवकाळीमुळे ‘रब्बी’ला उशीर

गव्हाच्या पेरणीने जिल्ह्यासह खानदेशात वेग घेतला असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी एका पंधरवड्याने खोळंबली होती.

मात्र सध्या गव्हाच्या पेरणीने जिल्ह्यासह खानदेशात वेग घेतला असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.(Wheat gram maize sowing speed in district jalgaon agriculture news)

यावर्षी गव्हाची पेरणी वेळेवर होऊ शकली नाही, जमिनीत ओल असल्यामुळे वखरणी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन तयार करण्यास उशीर झाला पर्यायाने गहू, हरभरा, मका व भुईमुगाची पेरणी दहा ते पंधरा दिवसाच्या उशिराने होत आहे.

खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात चोपडा, यावल, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, शहादा, शिरपूर, साक्री व शिंदखेडा आणि धुळे जिल्ह्यातील आजूबाजूचा परिसर तसेच तळोदा, नंदुरबार या भागात गव्हाची पेरणी केली जाते.

खरीप हंगामातील कपाशीचे पीक निघाल्यावर त्याखालील सुमारे ३५ टक्के क्षेत्रावर ही पेरणी होते. यावर्षी शासकीय अनुदानातून तसेच बाजारातून बियाण्याच्या ४० किलोची बॅग सतराशे ते १९०० रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले असून ९० टक्के पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे.

खानदेशात चोपडा, धरणगाव, एरंडोल या भागात ही पेरणी अधिक प्रमाणात होते. गव्हाच्या भावात यावर्षी थोडी तेजी असल्यामुळे आणि पेरणी आणि कापणीसाठी अडचण येत नसल्याने शेतकरी गव्हाच्या पेरणीकडे वळतात.

यावर्षी पेरणीला उशीर झाल्यामुळे एकरी उत्पादनात एक ते दीड क्विंटलने घट होणार असली तरी थंडीचा हंगाम लक्षात घेता ही पेरणी उशिरा जरी असली तरी ती पूर्ण करण्याच्या तयारीला शेतकरी लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT