Mahavitaran esakal
जळगाव

Jalgaon MSDCEL News : महावितरणाचे तारा जोडणीकडे दुर्लक्ष; भुसावळच्या काही भागात अंधार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहर परिसरात पाच दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे विशेषतः दक्षिण भागातील वीजपुरवठा दुपारी साडेचापासून खंडीत झाला. तो सुरु होण्यासाठी नागरिकांना दिवसभर वाट पहावी लागली. (While only one power line was broken in Srinagar area it not repair by mahavitaran even after 28 hours jalgaon news)

श्रीनगर भागात केवळ एक वीज तार तुटलेली असताना, ती जोडण्यासंदर्भात २८ तास होऊनही कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अंधारात राहावे लागले. महावितरणच्या या दुर्लक्षामुळे काही नागरिकांनी स्वतः खासगी वायरमनला पैसे देऊन वीज तारा जोडून विद्युत पुरवठा सुरु केल्याचा प्रकार घडला. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

परिसरात सध्या वादळी पावसाची अधूनमधून हजेरी लागत आहे. वादळाचा जोर वाढल्यानंतर अनेक भागातील विद्युत खांबांवरील वीज तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयात फोनवरुन विचारणा केल्यानंतर ‘आज काम होणार नाही, उद्या लाईट येईल’ असे उत्तर देण्यात आले.

वास्तविक, केवळ तार जोडणीचे छोटे काम असतानाही त्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठ्याचे रोटेशनही चुकले. ज्याचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वीज तारा जोडण्यासाठी कर्मचारी येत नसल्याने नाईलाजाने नागरिकांनी स्वतः खाजगी वायरमनच्या मदतीने स्वखर्चाने या वीज तारा जोडल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विशेष म्हणजे, हे काम सुरू असताना त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन यांनी भेट दिली. ‘महावितरणचे कर्मचारी पाठवतो’ असे सांगून ते तिथून निघून गेले. मात्र, रात्री आठपर्यंत कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी आलेला नव्हता. वास्तविक, २४ तासाच्या आत वीज पुरवठा सुरू करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

दरम्यान, शहरासारखी अशीच काही परिस्थिती तालुक्यातील काही गावांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून आले. परिणामी, अनेक गावांमध्ये बराचवेळ वीज पुरवठा सुरळीत झालेला नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली.

कामे न केल्याने अडचण

दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी वीज कंपनीकडून झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, वाकलेले तुटलेले खांब सरळ करणे, वीज तारांमध्ये योग्य अंतर ठेवणे, गार्ड लावणे, ‘डीपी’ची देखभाल दुरुस्ती करण्यासह इतरही आवश्‍यक ती कामे प्राधान्याने केली जातात. मात्र, महावितरणने मागील वर्षी ही कामे न केल्यामुळे यावर्षी अनेक ठिकाणी महावितरणच्या साहित्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.

अद्यापही अनेक ठिकाणच्या ‘डीपीं’वर झाडांच्या वेली दिसून येत आहेत. तर विद्युत खांब तसेच तारांवरही झाडे वाढलेली आहेत. काही भागात खांब वाकलेली आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी नागरिकांनी सांगूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा अनुभव रहिवाशांना आलेला आहे. यावर्षी तरी ही कामे जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करुन संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी प्रा. धीरज पाटील यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.

"वादळामुळे ज्या ज्या भागात वीज तारा तुटल्या होत्या, त्या दुरुस्त करुन जोडणीचे काम करण्याला प्राधान्य दिले आहे. मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे काही भागात झाली असून साधारणतः या महिन्यापर्यंत ज्या भागात कामे बाकी आहेत, ती लगेचच केली जातील."- प्रदीप घोरुडे, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, भुसावळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT