road before 'white topping' and after 'white topping' esakal
जळगाव

Jalgaon : रस्तेविकास आता ‘White Topping’द्वारे; 150 कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : यंत्र-तंत्रनिर्मिती, पायाभूत सुविधा उभारण्याच्या माध्यमातून राष्ट्राची उभारणी करणाऱ्या अभियंत्यांचा आज दिवस. या अभियंत्यांच्याच कल्पकतेतून विकसित झालेले ‘व्हाइट टॉपिंग’ तंत्रज्ञात आता जळगावच्या रस्त्यांसाठी वापरले जाणार आहे.(white topping technique will used for roads of Jalgaon latest marathi news)

जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट, दयनीयच्या पलीकडे झालीय. रस्त्यांच्या विकासावर अद्यापही महापालिकेस समाधान सापडलेले नाही. रस्त्यांच्या विकासाचे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. रस्तेविकासाच्या कामांबाबत महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असताना जळगावकरांचे मात्र हाल होत आहेत.

आता १५० कोटींच्या कामांचे प्रस्ताव

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रस्तेविकासासाठी शंभर कोटींचा निधी जाहीर केला, पैकी ४२ कोटींचा निधी उपलब्धही झाला. आता उर्वरित ५८ कोटी आणि आणखी ५० कोटी अशा १५० कोटींच्या कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केले आहेत. महापालिका व शासनाच्या तांत्रिक मान्यतेनंतर या प्रस्तावांतर्गत कामांना सुरवात होऊ शकणार आहे. महापालिकेने या १५० कोटींत कोणते रस्ते घ्यायचे, हे ठरवून द्यायचे आहे.

व्हाइट टॉपिंग’द्वारे विकास

रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने खर्च व वेळेची बचत करून रस्त्यांची कामे झाली तर त्याचे स्वागतच होणार आहे. म्हणूनच वेळ व खर्चाची बचत करून टिकतील असे रस्ते बनविण्यासाठी बांधकाम विभाग आता ‘व्हाइट टॉपिंग’द्वारे या रस्त्यांचा विकास करणार आहे. १५० कोटी खर्चाचे प्रस्ताव याच प्रक्रियेद्वारे रस्तेविकासाचे आहेत.

काय आहे ‘व्हाइट टॉपिंग’

हे रस्ते विकसित करण्यातील नवीन तंत्रज्ञान आहे. बेंगळुरू, हैदराबाद येथील रस्त्यांवर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले आहे. खड्ड्यांनी चाळण झालेल्या डांबरी रस्त्याचे ग्रीलिंग (हलक खोदकाम) करून त्यावर काँक्रिटचा थर करून संपूर्ण रस्ता यात तयार केला जातो.

व्हाइट टॉपिंग’चे फायदे

अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरल्याने रस्त्यांची उंची वाढत नाही, परिणामी, रस्त्यालगतच्या सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्‌भवत नाही. काँक्रिटचे ६ इंच, एक फुटाचे रस्ते करण्याने जे तापमान वाढते, त्याऐवजी ‘व्हाइट टॉपिंग’द्वारे रस्ते केल्यास तापमान कमी राखण्यास मदत होते. खर्च आणि वेळेची बचत होते. डांबरीकरणाच्या तुलनेत हे रस्ते टिकाऊ असतात. काँक्रिटीकरणासाठी लागणारी वाळू, खडी यात लागत नाही. त्यामुळे त्याचीही बचत होते. शिवाय वेळ व खर्चाचीही बचत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT