Husband wife News esakal
जळगाव

Jalgaon Crime News: प्रियकराच्या नादात पतीच्या घरात टाकला डाका; सोन अन् लाखोंची रोकड घेऊन पत्नी फुर्रर्र

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गणपतीनगरातील कापड व्यापाऱ्याच्या सुनबाईने १० लाखांची रोकड आणि सासूबाईच्या दागिन्यांसह स्वतःचे दागिने, असा ऐवज घेऊन धूम ठोकली आहे. याबाबत पीडित पतीने दिलेलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिसांत पत्नी, तिचा कथित प्रियकर, शालक व सासू-सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी मनोहर नाथानी यांचा मुलगा रोहीत आणि इंदूर येथील मोहनलाल मेहरणाी यांची मुलगी विन्नी हिच्यासोबत २९ जानेवारी २०१२ ला विवाह झाला. रोहीत आणि विन्नी यांना आठ वर्षांचा मुलगा आहे.

काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण झाले. तत्पूर्वी पत्नी विन्नी कधी भावाला तर कधी आई-वडिलांना पैसे देण्यास भाग पाडत होती. रोहीत याचा शालक सागर मेहरानी याने घेतलेले दोन लाख परत देण्यावरून वाद झाला. तेव्हापासून पती-पत्नीचा वाद वाढतच गेला.

गणपतीनगरमधील पान दुकानावर रोहित नाथानी यांना तुषार उदासी भेटला. त्याने रोहितच्या पत्नीसोबतचे छायाचित्र दाखवून पत्नीला फारकत देण्यासाठी त्याने धमकावले. नंतर काही दिवसांनी रोहितची पत्नी विन्नी हिने इंदूर येथे मावस भावाच्या लग्नाला जाण्याचा बहाणा करून घरातील एकत्र ठेवलेल्या दागिन्यातील स्वतःचे व सासूबाईचे दागिने, दहा लाखांची रोकड घेऊन पोबारा केला.

याप्रकरणी रोहित नाथाणी यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पत्नी विन्नी रोहित नाथाणी, तुषार उदासी, सासरे मनोहर मेहरानी, सासू भावना, शालक सागर यांच्याविरुद्ध चोरी, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.

मोबाईल चॅटिंगने उलगडा

विन्नी हिला दिल्लीत नोकरी लागल्याचे खोटे अपाईंटमेंट लेटर दाखवून ती माहेरी व तेथून प्रियकरासोबत दुबईला जाऊन आली होती. विन्नी नाथानी हिला घेण्यासाठी रोहित इंदूरला गेला होता. सोबत जळगावला परतत असताना, त्याच्या हातात पत्नीचा मोबाईल लागला.

त्यातील चॅटिंगवरून पत्नीचे तुषार उदासी याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची खात्री झाली. या दोघांच्या चॅटिंगसह मोबाईल संभाषणाच्या क्लीप रोहित याने संकलित केल्या. त्या पोलिसांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT