wife torture by husband due to business loss jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा छळ

विवाहितेला तीन वर्षांच्या मुलासह पती व सासरच्या मंडळींनी घरातून हकलून लावत अकोला-जळगाव गाडीत बसवून माहेरी रवाना केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील गणपतीनगरातील माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेला तीन वर्षांच्या मुलासह पती व सासरच्या मंडळींनी घरातून हकलून लावत अकोला-जळगाव गाडीत बसवून माहेरी रवाना केले. (wife torture by husband due to business loss jalgaon news)

व्यवसायात तोटा झाल्याने पतीला सासरच्या मंडळींनी पैसे न दिल्याने विवाहितेला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात असल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपतीनगर येथे सेानम सागर जयसिंगानीया (वय ३३) या गेल्या काही दिवसांपासून माहेरी भावाकडे वास्तव्यास आहेत. त्यांचे १२ मे २०१९ रोजी अमरावती येथील सागर शंकरलाल सिंघानिया यांच्या सोबत दुसरे लग्न झाले असून सामाजिक रितीरीवाजानुसार माहेरच्या मंडळींनी हुंडा म्हणून एक ॲक्टिव्हा स्कुटी, १५ तोळे सोनं दिले होते.

लग्नानंतर साधारण तीन वर्षे चांगली वागणूक दिली. मात्र पतीला हार्डवेअर व्यवसायात तोटा झाल्यानंतर माझ्या माहेरच्या मंडळींनी पतीला व्यवसायाकरिता लागणारे पैसे द्यावेत.

यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी छळ करून मारहाण केल्यावर अमरावती पोलिसात तक्रार देऊनही त्यांच्यात सुधारणा न होता पती व सासरच्या मंडळीनी ७ एप्रिल २०२३ रेाजी जळगाव जाणाऱ्या गाडीत बसवून माहेरीपाठवून दिल्याची तक्रार पीडित विवाहितेने दिल्यावरून पती सागर, सासरे शंकरलाल, सासू किरण, दिर भरत अशांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT