tiger and leopard esakal
जळगाव

Wildlife Animal Census : डोलारखेड्यात पट्टेदार वाघ, यावल अभयारण्यात बिबट्या

सकाळ वृत्तसेवा

Wildlife Animal Census : मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प व यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात प्राणी गणना झाली. त्यात मुक्ताई व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघाचे दर्शन घडले. यावल अभयारण्यात बिबट्याचे दर्शन घडले.

याशिवाय १५० पेक्षा विविध प्रकारचे प्राणी दिसून आले. मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा व डोलारखेडा वनपरिक्षेत्रात वायला, कोयला, भट्टी, बारी, भाटी, धरण, भाऊ कुटी, बंधारा लोखंडी मचान आदी ठिकाणी जंगलात मचाणी उभारल्या होत्या. (Wildlife Animal Census Striped Tigers in Dolarkhedi Leopards in Yaval Sanctuary jalgaon news)

आढळलेले प्राणी असे

पट्टेदार वाघ, तरस, अस्वल, रानडुक्कर, रान ससा, नीलगाय, लोधडी, चितळ, रान गवा, माकडे, हरीण, चिकारा आदी प्राणी आढळले. वन संरक्षक दिगंबर पवार (धुळे), उप वनसंरक्षक विवेक होशिंग (जळगाव), सहाय्यक उपवनसंरक्षक उमेश बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे (डोलारखेडा), वनपाल डी. जी. पाचपांडे, वनपाल डी. आर. मराठे या वेळी उपस्थित होते.

पाल वनपरिक्षेत्रात बारा मचाणीवर प्राणी गणना करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वनरक्षक यांनी काम केले. हेमराज पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे संकेत पाटील, अंकित पाटील,

(रावेर), डॉ. अविनाश गवळी (भुसावळ), पराग चौधरी, मनीष चव्हाण (पाल), कल्पेश खत्री (फैजपूर), लंगडा आंबा वनपाल समाधान करंज, वनरक्षक अब्दुल तडवी, जामन्या वनपाल पाटील, वनरक्षक अजय चौधरी, वन्यजीवचे वनपाल संभाजी सूर्यवंशी यांनी गणनेत सहभाग घेतला.

चिंकारा, लांडगा, कोल्हा...

पाल वनपरिक्षेत्रात चिंकारा ९, वानर ११, लांडगा ८, भेकर १, नीलगाय १, बट १, ससा ६, मोर १५, कोल्हा १२, रान मांजर ७, तरस ७, रानडुक्कर ७, उदमांजर २, हरीण १५ आढळून आले.

लंगडा आंबा वनपरिक्षेत्रात रान डुक्कर ४, कोल्हे ५, अस्वल १, मोर ३, रान ससे २, जामन्या वनपरिक्षेत्रात हरीण ६, अस्वल १, मोर ५, माकड १०, कोल्हे २ आढळले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रशियातील पक्षी आढळला

वरणगाव चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे बोदवड वनपरिक्षेत्रातील साळशिंगी येथे प्राणी गणना करण्यात आली. त्यात ससा, माकड, रानडुकरे या प्राण्यांसह ठिपक्यांचा ‘टीलवा’ हा रशियातील पक्षी आढळून आला.

ढगाळ वातावरण अन्‌ हिरमोड

मुक्ताई भवानी परिसरात रात्रभर ढगाळ वातावरण होते. त्या भागात पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी आहे. त्यामुळे पाणवठ्यांवर प्राणी आले नाहीत. आले असतील, तरी ते अंधारामुळे दिसले नाहीत, अशी माहिती वन्यजीव सरंक्षण संस्थेचे राहुल सोनवणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT