Dry Fruit News esakal
जळगाव

Jalgaon News : थंडीत उर्जेसाठी खा सुकामेवा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : हिवाळा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानला जातो. या काळात शरीराला ऊर्जा देण्याचे काम ‘सुकामेवा’ करते. सुकामेव्यात ऑइल असतात. ते खाल्ल्याने सतत भूक लागत नाही. हिवाळ्यात दिवसभर मूठभर सुकामेवा खावा.

त्यातून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळते. परिणामी, शरीराची वाढ चांगली होते. बदाम, अक्रोड, पिस्ता गूळ किंवा तिळाबरोबर खाल्यास शरीरास फायदेशीर ठरते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. थंडीमुळे सुकामेव्यापासून लाडू तयार करून सेवन केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होतो. यामुळे सुकामेव्याला मागणी वाढली आहे. खारीक, खोबरेवगळता इतर सुकामेव्यांचे दर स्थिर आहेत.(Winter Season Health Tips Eat dry fruits for energy in winter Jalgaon News)

मागणी कशाला?

बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता

मागणी का?

थंडीत खोबरे, डिंक, मेथी आदीपासून तयार केलेल्या लाडूंना अधिक मागणी असते. लाडू बनविण्यास ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खोबरे आदींना मागणी आहे.

काय आहे सद्यःस्थिती...

*थंडीमुळे मागणीत वाढ

*सुकामेव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन

*कोरोनाचे सावट नसल्याने आवक वाढली

आयात येथून होते

*बदाम : कॅलिफोर्निया, आस्ट्रेलिया, अफगणिस्तान

-पिस्ता : इराण, इराक, तर्की, अमेरिका

-अक्रोड : अमेरिका, चिल, भारत

-अंजीर : इराण, अफगणिस्तान

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

देशांतर्गत आवक

-खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक

-काजू : गोवा, कर्नाटक, केरळ, कोकण

-मनुके : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर

दर असे

-बदाम : ६६० ते ८०० रुपये

-काजू : ६०० ते १०००

-पिस्ता : ४०० ते ८००

-अक्रोड : ७०० ते १०००

-खोबरे : १९० ते २०० रुपये

यांच्या दरात वाढ

-अंजीर : ९०० ते १५०० रुपये

-खजूर : १०० ते ५००

-खारीक : ४०० ते ५०० रुपये

"बदाम, काजूचे दर स्थिर आहेत. सुकामेव्याला थंडीमुळे मागणी वाढली आहे. थंडीला सुरवात झाली आहे. अजून मागणी वाढेल."

-शुभम कासार, प्रसाद प्रोव्हिजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT