Bribe Case esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : 5 हजारांची लाच घेताना वायरमनला अटक

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : बंद पडलेले वीजमीटर बदलवून देण्यासाठी विद्युत अभियंत्यांच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वायरमनला धुळे विभागाच्या लाचलुचपत विभागाने पकडून अटक केली आहे. (Wireman arrested while accepting bribe of 5 thousand Jalgaon Bribe Crime news)

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

अमळनेर तालुका शिवसेनाप्रमुख श्रीकांत अनिल पाटील यांच्या राहत्या घराचे वीजमीटर पाच महिन्यांपासून बंद होते. त्यांना सरासरी बिल येऊन ते नियमित भरत होते. दहा दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख हे पाटील यांच्या घरी वीजमीटरची पाहणी करून गेले होते. त्यानंतर वायरमन भरत पाटील यांनी सांगितले, की मीटर बंद आहे. ते बदलावे लागेल. अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला दंड लागेल, असे सांगितले. म्हणून पाटील यांनी सोमवारी (ता. ५) लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.

त्यावरून लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाने, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागूल यांच्या पथकाला पडताळणीसाठी पाठविले असता, भरत पाटील यांनी तडजोडीअंती पाच हजारांची रक्कम स्वीकारली. भरत पाटील याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmi Shukla : निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

Cancer : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग घेतोय महिलांचा जीव

Ekanth Shinde: एकनाथ शिंंदे पुन्हा मुख्यमंत्री नाही झाले तर महायुतीला बसणार फटका ? वाचा महत्त्वाची बातमी

Maharashtra Winter : राज्यभरात गारठा वाढला! किमान तापमानाचा पारा घसरू लागला

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT